NMC News  esakal
नाशिक

Solid Waste Collection : दिवाळीत कचरा संकलनात वाढ; सरासरी सव्वा टन अतिरिक्त कचरा

विक्रांत मते

नाशिक : दीपावलीनिमित्त शहरात कचरा संकलनात वाढ झाली आहे. दररोज साडेसहाशे टन घनकचरा संकलित होतो. दिवाळीनिमित्त मात्र गेल्या दहा ते १२ दिवसांपासून सव्वाशे टन अतिरिक्त कचरा संकलित होत आहे. (NMC News Increase in waste collection during Diwali average of half ton of extra waste Nashik News)

महापालिकेच्या सहाही विभागांत सरासरी कचरा संकलन वाढले आहे. दिवाळी असल्याने सध्या सरासरी १०० ते १२० टन कचरा जास्त उचलला जात आहे. महापालिकेकडून सरासरी दररोज ६५० ते ६६० टन कचरा संकलित केला जातो. महापालिकेने १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबविली होती. त्यात कचरा संकलन जास्त होत असल्याचे दिसून आले.

दिवाळीनिमित्त पाचही दिवस कचरा संकलनाची मोहीम सुरू राहणार आहे. ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, घरगुती घातक वैद्यकीय कचरा, विद्युत कचरा, असे वर्गीकरण करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कचरा डब्याचे रंगही वेगळे असावेत, अशी सूचना आहे. ‘माझी दिवाळी, स्वच्छ दिवाळी’

या अनुषंगाने नागरिकांनी सणाचा आनंद लुटावा, शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, तसेच दिवाळीनिमित्त प्लॅस्टिक न वापरण्याचाही संकल्प नागरिकांनी करावा, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे. घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाही विभागांचे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता मोहीम राबवीत आहेत.

बारा दिवसांतील कचऱ्याची आकडेवारी

तारीख वजन ( टनामध्ये)

११ ऑक्टोबर : ७५४.१२

१२ ऑक्टोबर : ७७५.७०५

१३ ऑक्टोबर : ७२७.०६

१४ ऑक्टोबर : ७०९.४७

१५ ऑक्टोबर : ७६६.६३५

१६ ऑक्टोबर : ७४०.७२

१७ ऑक्टोबर : ७३३.५७५

१८ ऑक्टोबर : ७५०.२१५

१९ ऑक्टोबर : ७८९.५१

२० ऑक्टोबर : ७८०.३३५

२१ ऑक्टोबर : ७६६.१२५

२२ ऑक्टोबर : ७८५.६९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द! आरोपी, तक्रारदार तरुणीत प्रेमाचे नाते, न्यायालयाचे निरीक्षण

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video

SCROLL FOR NEXT