NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: कुष्ठरुग्ण, क्षयरूग्ण शोधमोहिम धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही दिवसात महापालिकेत विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याने त्यातून नाराजीचे फटाके फुटत आहे. वैद्यकीय विभागाकडून केंद्र सरकारच्या सूचनेवरून क्षयरोग व कुष्ठरोग शोधमोहिमेच्या सूचना देण्यात आल्या.

परंतु, वैद्यकीय विभागात मोहीम राबविण्यासाठी अधिकारीच नसल्याची बाब समोर आली असून, यासंदर्भात आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे परिस्थिती कथन केल्यानंतर तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या. (NMC News Leprosy Tuberculosis research mission in jeopardy nashik)

महापालिकेत नगररचना, बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा, ड्रेनेज विभागात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले. त्याचा परिणाम मोठ्या पदांवर जे बसले त्यांच्यात समाधानाचे वातावरण असले तरी नाराजांची नाराजी अद्यापही दूर झालेली नाही.

वैद्यकीय विभागात क्षयरोग, कुष्ठरोग विभागाचा कार्यभार असलेले डॉ. आवेश पलोड यांची बदली आरोग्य संचालक पदावर करण्यात आली. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. कल्पना कुटे यांच्याकडे कुष्ठरोग व क्षयरोग विभागाचा कार्यभार देण्यात आला.

परंतु अद्यापही डॉ. कुटे यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यात केंद्र सरकारकडून कुष्ठरोग व क्षयरोगींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आले.

परंतु अधिकारीच नसल्याने कामाला सुरवात झालेली नाही. या विभागाकडे चार कर्मचारी आहे. त्यांना देखील कुठल्या प्रकारच्या सूचना नसल्याने महापालिका हद्दीत शोधमोहीम धोक्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Navi Mumbai: नवी मुंबईची कोंडी सुटणार, खारघर-तुर्भे लिंक रोड कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

37 वर्षं गायब आहे बॉलिवूडमध्ये नावाजलेली मराठी अभिनेत्री; ऋषी कपूर यांच्यावर केलेले आरोप !

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

IND vs PAK: 'भारताच्या DNA मध्ये ट्रॉफी अन् आमच्यामध्ये फक्त पराभव...' माजी कर्णधाराने काढले पाकिस्तान क्रिकेटचे वाभाडे

SCROLL FOR NEXT