remdesivir e-sakal
नाशिक

...तरीही महापालिकेने मागविले पाच हजार इंजेक्शन?

दोन दिवसांपूर्वी महापालिकेला एक हजार इंजेक्शन प्राप्त झाल्याने रुग्णालयांमध्ये तुटवडा नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांवर(Corona patients) उपचार करताना रेमडेसिव्हिर इंजेक्शनची(Remdesivir injection) आवश्‍यकता नसल्याचे स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेने दिले असले तरी महापालिकेने गुजरातच्या मायलन(Mylan) कंपनीकडून पाच हजार नव्या इंजेक्शनची मागणी नोंदविली आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेला एक हजार इंजेक्शन प्राप्त झाल्याने रुग्णालयांमध्ये तुटवडा नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. (Nashik Municipal Corporation purchase five thousand Remdesivir injections)

इंजेक्शन खरेदीवर प्रश्‍नचिन्ह?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बेड, ऑक्सिजन(Oxygen) व व्हेंटिलेटर(Ventilator) बेडचा तुटवड्यानंतर नागरिकांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. महापालिकेने आतापर्यंत दहा हजार इंजेक्शन खरेदी केले. जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) रेमडेसिव्हिर इंजेक्शन फिजिशिअनच्या सल्ल्यानुसारच घेण्याचा सल्ला दिला असताना महापालिकेने आता पुन्हा नव्याने पाच हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी गुजरातमधील मायलन कंपनीकडे नोंदविली आहे. आगाऊ पैसे भरल्यानंतर यातील एक हजार इंजेक्शन बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयात प्राप्त झाले आहे. वास्तविक आरोग्य संघटनेने रेमडेसिव्हिर इंजेक्शनची आवश्‍यकता नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, तर दुसरीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना महापालिकेच्या इंजेक्शन खरेदीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT