NMC Nashik News
NMC Nashik News esakal
नाशिक

NMC Recruitment : TCS मार्फत नोकर भरतीवर शिक्कामोर्तब!जुलै महिन्यात भरतीचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

NMC Recruitment : महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील एकूण ७०६ पदांसाठी टाटा कन्सल्टन्सी मार्फत भरती करण्याच्या निर्णयावर महापालिकेने शिक्कामोर्तब केले.

नोकरभरती संदर्भात तीन वर्षे मुदतीचा करारनामा करण्यात आला असून, जुलै महिन्यात प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला सुरवात होईल. अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली. (NMC Recruitment Sealed job recruitment through TCS notification in month of July nashik news)

महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत. महापालिकेला ब वर्गाचा दर्जा मिळालेला असल्याने १४ हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे.

मात्र अद्याप तो आराखडा मंजूर झालेला नाही. नियमित रिक्तपदे भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची अट टाकली आहे. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्तपदांची भरती करू नये. अशा स्पष्ट सूचना आहेत.

परंतु कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला.

परंतु भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्या अशा स्पष्ट सूचना अध्यादेशामध्ये आहेत. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांच्या माध्यमातूनच भरती करता येणार आहे. महापालिकेने दोन्ही कंपन्यांना सुरवातीला निमंत्रित केले.

परंतु टीसीएसने नकार दिल्यानंतर ‘आयबीपीएस’ ने नोकर भरतीसाठी होकार कळविला. परंतु, आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता आणि अटी व शर्तींचा विचार करता आयबीपीएस कंपनीला नकार देण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानंतर टीसीएस कंपनीकडे महापालिकेकडून प्रस्ताव सादर करण्यात आला. टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधी समवेत चर्चा झाल्यानंतर कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. त्या मसुद्याला महासभेची मंजुरी घेण्यात आली.

मागील आठवड्यात टीसीएससमवेत करारदेखील करण्यात आला. भरतीसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर एप्लीकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून, त्यासाठी कंपनीकडून प्रोजेक्ट मॅनेजरची नियुक्तीदेखील करण्यात आली. आगामी तीन वर्षासाठी हा करार असून आता कुठलीही भरती टीसीएस मार्फतच केली जाणार आहे.

उमेदवाराच्या संख्येवर ठरणार फी

टीसीएस कंपनीच्या माध्यमातून भरती करताना एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे. दहा हजारापर्यंत परीक्षार्थी आल्यास एका उमेदवारासाठी ६७५ रुपये आर्थिक मोबदला कंपनीकडून आकारला जाणार आहे.

दहा हजार ते पन्नास परीक्षार्थी आले तर एका उमेदवारासाठी सहाशे रुपये दर आकारला जाणार आहे. एक लाखांपर्यंत परीक्षार्थी आल्यास प्रत्येक उमेदवार ५७५ रुपये असा दर आकारला जाईल दोन लाखांपर्यंत ५५० रुपये, पाच लाखांपर्यंत उमेदवार आल्यास ४७५ रुपये याप्रमाणे मोबदला द्यावा लागणार आहे.

"टीसीएस कंपनीसमवेत नोकरभरतीचा करार झाला असून, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी नोकर भरतीला सुरवात होईल."

- मनोज घोडे-पाटील, उपायुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT