NMC Recruitment esakal
नाशिक

NMC Recruitment : रिक्तपदे भरतीसाठी निवड समिती गठित!

महापालिकेच्या अग्निशमन व वैद्यकीय विभागातील जवळपास ७०० पदे भरण्यासाठी टीसीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या अग्निशमन व वैद्यकीय विभागातील जवळपास ७०० पदे भरण्यासाठी टीसीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘टीसीएस’ मार्फत भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचबरोबर आता भरती करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठित करण्यात आली आहे. (NMC Recruitment Selection committee formed for recruitment of vacancies nashik news)

नाशिक महापालिकेला क वर्ग दर्जा असल्याने १९९५ मध्ये ७०९२ पदांचा आकृतिबंध शासनाने मंजुरी केला होता. त्यानंतर महापालिकेचा ब संवर्गात समावेश झाला. त्यानुसार नवीन आकृतिबंध सादर करण्यासाठी शासनाने सूचना दिल्या.

महापालिका प्रशासनाकडून जवळपास १४ हजार पदांचा आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला. त्यापूर्वी कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागातील ३४८ व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली.

डॉक्टरांची ८२ पदे वगळता उर्वरित पदे भरण्यासाठी नाशिक महापालिकेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

सरळ सेवा भरती संदर्भात व इतर आनुषंगिक कामे करण्यासाठी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठित करण्यात आली आहे.

समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व कर उपायुक्त श्रीकांत पवार व मुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''भाऊ म्हणून बहिणीचं रक्षण करणार'', अजित पवार उज्वला थिटेंवर पहिल्यांदाच बोलले, पाटलांना दिला दम

Latest Marathi News Live Update : रहिमतपूर नगरपालिका निवडणूक: शिंदे गट–अजित पवार गट हातमिळवणी; प्रचारसभेत अजित पवारांची उपस्थिती

सुरजची लगीनघाई! घाणा भरण्याचा कार्यक्रम अन् संजनाच्या हातावर रंगली झापुक झुपूकच्या नावाची मेहंदी

Grapes Season : अतिवृष्टीमुळे जुन्नरला द्राक्ष हंगामच वाया; ३६ कोटींचे कर्ज फेडण्याची उत्पादकांना चिंता

Palus Muncipal Election : “पलूसमध्ये काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादी महायुतीची तिरंगी झुंज; प्रतिष्ठा व अस्तित्वाची निर्णायक निवडणूक”

SCROLL FOR NEXT