File Photo esakal
नाशिक

NMC School Problem: गळक्‍या छताखाली भरताय विद्यार्थ्यांचे वर्ग! पाहणीत 30 शाळांची अवस्‍था गंभीर

सकाळ वृत्तसेवा

NMC School Problem : मॉन्‍सून राज्‍यात दाखल झालेला असताना शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. एकीकडे नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी नाशिक महापालिकेच्‍या काही शाळांमधील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.

गळक्‍या छताखाली वर्ग भरत असल्‍याने या विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढीव निधीच्‍या मागणीमुळे सुमारे ३० शाळांचे दुरुस्‍तीचे काम प्रलंबित असल्‍याची माहिती मिळते आहे. (NMC School Problem Classes of students under leaky roof condition of 30 schools in inspection critical nashik)

उन्‍हाळी सुटी सुरू असताना नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होण्यापूर्वीच शालेय इमारतींची दुरुस्‍ती केली जाण्याची आवश्‍यकता होती. परंतु शाळा दुरुस्‍तीच्‍या कामासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना, बांधकाम विभागाकडून वाढीव निधीसाठी काम रखडविले गेल्‍याचे समोर येते आहे.

प्रारंभी बांधकाम विभागाकडून सुमारे साडे अकरा कोटी रुपयांच्‍या निधीची मागणी केली होती. कालांतराने त्‍यात वाढ करताना आता साडेबारा कोटींहून अधिक निधीची मागणी सादर केलेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यापूर्वी निर्धारित निधी खर्च झालेला नसल्‍याने यंदा महापालिका प्रशासनाने मर्यादित स्वरूपात निधी राखीव ठेवला होता. या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे.

दरम्‍यान, शिक्षण विभागाने केलेल्‍या पाहणीत साधारणतः तीस शाळांची अवस्‍था गंभीर असल्‍याचे समोर येते आहे. या शाळांची तातडीने दुरुस्‍ती केली जाण्याची गरज आहे. परिस्‍थितीचे गांभीर्य लक्षात घेता, दुरुस्‍ती कामाला तातडीने प्रारंभ करावा, अशी मागणी केली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT