NMC News esakal
नाशिक

बेघरांसाठी NMCचे निवारा घर; 894 बेघर लाभार्थ्यांची नोंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील सिग्नल, मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने निवारागृहात रवानगी करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत १७० जणांना निवारागृहात सामावून घेण्यात आले, तर ४५ नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना घरी सोडण्यात आले. (NMC shelter home for homeless people 894 registered homeless beneficiaries Nashik Latest Marathi News)

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बेघरांचे सर्व्हेक्षण करून तातडीने निवारागृहात दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुंबई नाका, द्वारका तसेच महत्त्वाच्या चौकामधून बेघरांना विविध ठिकाणच्या निवारागृहात दाखल करण्यात आले. तपोवन येथील बेघर निवारा केंद्रात सध्या १०२ लाभार्थी आहे. त्यातील १९ जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

संत गाडगे महाराज बेघर निवारा केंद्रात ६८ लाभार्थी असून, त्यातील २६ जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. चहा व नाश्त्याच्या सोयी बरोबरच बेघरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला.

४५ नागरिकांचे समुपदेशन

निवारागृहामध्ये दाखल करण्यात आलेल्या बेघरांपैकी ४५ बेघर नागरिक व त्यांच्या कुटुंबांचे समुपदेशन करून सोडून देण्यात आले. लाभार्थ्यांचे पुनर्वसन करणे, लाभार्थ्यांना कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Stock Limit: साखर व्यापाऱ्यांना मोठा झटका! ४ हजार क्विंटलपेक्षा जास्त साठ्यावर बंदी; १ ऑगस्टपासून नवे नियम

Koyna Water Release: कोयना धरणातून मोठा विसर्ग! ९१ टीएमसी पाणीसाठा, कृष्णा नदीची पातळी वाढली

Gen Z's New Craze: 'स्नेल मेल' ट्रेंड नक्की आहे तरी काय? जेन झीला अचानक का आवडायला लागलीत हाताने लिहिलेली पत्रे!

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशातील नवे कायदे राज्यातही अंमलात आणणार - मुख्यमंत्री विष्णू देव साय

Success Story: तळेगावच्या मुलीची देशभरात चर्चा! 'मिस गॉर्जियस फेस ऑफ इंडिया' किताबावर नाव; जिद्द, मेहनत अन् स्वप्नांची कमाल

SCROLL FOR NEXT