NMC Drain Cleaning esakal
नाशिक

Nashik : शहरात नाले सफाईला गती

विनोद बेदरकर

नाशिक : पावसाच्या (Rains) आगमनाचा अंदाज लक्षात घेऊन महापालिकेच्या (NMC) पूर्व पावसाळी कामांना गती आली आहे. शहरात ५० हजार ७७१ मीटर लांबीच्या गटारींची सफाई पूर्ण करण्यात आली असून, पावसाळी गटार (Drain) योजनेतील ढापे काढून नाल्याची स्वच्छता झाल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. (NMC Speed ​​up cleaning of drainage in city Nashik News)

पावसाळी नाला सफाईची ५०९२६ मिटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. त्यात नाशिक पूर्व ३१५०, पश्चिम ८९०, पंचवटी १८१११, नाशिक रोड १२२००, नवीन नाशिक ८७१०, सातपूर ७८६५, मिटर लांबीची साफसफाई करण्यात आली आहे. तर तर पावसासाठी खुल्या गटारींची ५८०४८ मिटर लांबीच्या गटारींची साफसफाई करण्यात आली आहे. नाशिक पूर्व १४११५, पश्चिम ९४०, पंचवटी ८९७०, नाशिक रोड १६२७८, नवीन नाशिक १४७१३, सातपूर ३०३२ मिटर लांबीच्या गटारींचा समावेश आहे. आरसीसी पाइप गटारांवरील १३ हजार ९४६ चेंबरची सफाई करण्यात आली आहे. नाशिक पूर्व २९५७, पश्चिम ३४०९, पंचवटी १३५३, नाशिक रोड १०५३, सिडको २२७५, तर सातपूर २९९० चेंबरचा समावेश आहे

त्याचबरोबर पावसाळी खुल्या गटार योजनेतील कामेही पूर्ण झाली आहेत. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड सर्वच भागांतील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आपत्कालीन व्यवस्थाही करण्यात आली आहे. पाणी साठण्याच्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयुक्त रमेश पवार यांनी विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पावसाळापूर्व कामांचा आढावा घेत विभागीय अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. शहरात कायम सांडपाणी साठणाऱ्या सराफ बाजार भागात नेहमी पाणी साचते. अशा नागरिकांच्या तक्रारी असलेल्या भागात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT