NMC News  esakal
नाशिक

NMC Tax Recovery : दीडशे पैकी 117 कोटींची यंदा घरपट्टी वसुली!; महापालिका प्रशासनाला दिलासा

विक्रांत मते

नाशिक : स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करताना महसुलात जवळपास ४०० कोटी रुपयांची तूट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता करात मात्र समाधानकारक वसुली होत आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीला काही प्रमाणात आधार मिळताना दिसत आहे. पाणीपट्टीच्या माध्यमातूनदेखील जवळपास ३१ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. (NMC Tax Recovery 117 crore out of 150 crores recovered this year Relief to administration Nashik News)

मालमत्ता कराच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत निधी जमा होतो. व्यावसायिक व वाणिज्य अशा प्रकारात शहरात जवळपास पावणेचार लाख मालमत्ता आहे. या मालमत्तांच्या माध्यमातून यंदा दीडशे कोटी रुपये महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर कर विभागाच्या माध्यमातून आगाऊ कर भरल्यास पहिले तीन महिने सूट दिली जाते. त्यानंतर मार्च महिन्यात समाधानकारक वसुली होते. यंदा मात्र डिसेंबर अखेरपर्यंत जवळपास ११७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

उर्वरित जवळपास ३२ कोटी रुपये मार्च महिन्यापर्यंत वसूल होतील, असा विश्वास विविध कर विभागाला आहे. नियमित कर वसूल होत असताना दुसरीकडे मात्र थकबाकीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. थकबाकी वसूल झाल्यास महापालिकेच्या तिजोरीत दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची भर पडेल, मात्र थकबाकीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

पाणीपट्टीची समाधानकारक वसुली

थकबाकी वगळता पाणीपट्टीच्या माध्यमातून ७५ कोटी रुपये महसुलाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यातून जवळपास ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करताना विविध कर विभागाला मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. संपूर्ण शहरातून वसुली करण्याची जबाबदारी ८० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. या कर्मचाऱ्यांना फक्त वसुली हेच उद्दिष्ट नाही, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा निवडणूक आयोगाकडून निश्चित केलेल्या कामांची जबाबदारीदेखील पार पाडावी लागते. अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांकडून होणारी वसुली समाधानकारक असल्याचे मानले जात आहे.

विभागनिहाय आतापर्यंत झालेली घरपट्टी वसुली (कोटीत)

विभाग वसुली

सातपूर १३, २५,०८,०२५

पश्चिम २२,५७,८७,८६१

पूर्व १९, ३६,११,८५६

पंचवटी २०,१२,८१,३५७

सिडको २४,२९,८५,६०१

नाशिक रोड १७,५७,८८,८८६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT