Tuberculosis Balance Diet esakal
नाशिक

NMC Tuberculosis survey : शहरातील 1200 रुग्णांना पोषण आहाराची गरज

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेकडून करण्यात आलेल्या क्षयरोग सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत १२०० क्षय रुग्णांना पोषण आहार देण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, निक्षय मित्र योजनेअंतर्गत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गंत क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी शुक्रवारी (ता. १६) आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. (NMC Tuberculosis survey 1200 patients in city need nutritional food nashik news)

या वेळी अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांनी क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत क्षय रुग्णांचे ‘निक्षय मित्र’ व्हावे, असे आवाहन केले. मनपाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी प्रस्ताविक केले. सद्यःस्थितीत मनपा कार्यक्षेत्रात १२०० क्षयरुगणांना पोषण आहार देण्याची आवश्यकता आहे.

क्षयरोग नियंत्रण विभागामार्फत रुग्णालयनिहाय रुग्णांची माहिती ‘निक्षय मित्र’ यांना देण्यात येईल. त्यानुसार पोषण आहाराचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती दिली. या वेळी जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. हर्षद लांडे यांनी पोषण आहार बास्केट, शासनाच्या मार्गदर्शक सूचना, पोषण आहाराची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी बैठकीत उपस्थितांच्या प्रश्नांचे आणि शंकेचे निरसन केले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

नियोजन करून योग्यप्रकारे आहार वाटपाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. बैठकीला उपस्थित मान्यवरांनी क्षयरुगणांना पोषण आहार देण्यास संमती दर्शविली आहे. बैठकीसाठी सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी माजी नगरसेवक जगदीश पाटील, गुरमित बग्गा, सलीम शेख, दीक्षा लोंढे, अमोल पाटील, ‘इंडोलाईन’ च्या सपना पाटील, अंबड इंडस्ट्रिअल असोसिएशनचे सचिव ललित बूब, रोटरी क्लब अध्यक्षा सोनल रॉय, (स्व.) हरिभाऊ गिते फाउंडेशनच्या दीपाली गिते, कमल फाउंडेशनचे औटे, डिशचे श्रीकांत कुलकर्णी, आयएपीचे अध्यक्ष डॉ. केदार मालवतकर, नरडेको अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुशील गावडे, मनीषा विसपुते, समता सामाजिक विकास संस्था आणि रोटरी क्लब वेस्ट या संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: टीम इंडिया कोणत्या Playing XI सह मैदानावर उतरणार? प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची हिंट...

Pune University : विद्यापीठाच्या आदेशाची अवहेलना; वार्षिक अहवालासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Heart Transplant: विमानसेवेमुळे सोलापूरचे ‘हृदय’ आता ३० मिनिटांत पुण्यात; हृदयाचे ग्रीन कॉरिडॉर शक्य, अवयवदान चळवळीला मिळणार नवा आयाम

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटचा फायदा होणार नाही, संजय लाखे पाटील; जरांगेंचे आंदोलन चुकीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT