NMC water bill app esakal
नाशिक

पाणीपट्टी वसुली ॲपला प्रतिसाद; घरबसल्या भरा आता पाणीपट्टी

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिका हद्दीतील नळजोडणी धारकांना पाणीपट्टीचे (Water Bill) देयके मुदतीत मिळण्यासाठी, तसेच नळजोडणी धारकांच्या सोईनुसार रीडिंग स्वतः छायाचित्रांद्वारे प्राप्त करून मोबाईल, मेलवर बिलाची सुविधा महापालिकेच्या (NMC) ‘एनएमसी वाटर टॅक्स अॅप’ द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC commissioner) यांनी पाणी बिल वसुली वाढविण्यासाठी तसेच ग्राहकांना त्यांच्या सोयीने बिल भरता यावे यासाठी ऑनलाइन अॅप सुरू केले आहे. (NMC Water Bill recovery app Nashik News)

ॲपमध्ये नळजोडणी धारकाला त्याच्या मिटरचे स्वतः वाचन करून देयक प्राप्त करून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. नळजोडणी धारकाने जलमापक सुरू ठेवणे, योग्य ठिकाणी बसविणे आवश्यक आहे. तसेच, जलमापक बंद असल्यास ते दुरुस्ती करून घेणे अनिवार्य आहे. एनएमसी वाटर टॅक्स अॅप हाताळणी महापालिकेच्या संकेतस्थळावरून करणे शक्य होणार आहे. शहरातील प्रत्येक नळजोडणी धारकाला गुगल प्ले स्टोअरवरून एनएमसी वॉटर टॅक्स अॅप मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल.

अॅप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकाला स्वतःची माहिती भरावी लागेल. नोंदी पूर्ण झाल्यानंतर महापालिकेतर्फे अॅप्लिकेशन जलमापकाचे वाचन करण्यासाठी संदेश येईल. त्या कालावधीत नळजोडणी धारकाला एनएमसी वाटर टॅक्स अॅपमध्ये लॉगिन करणे, नळजोडणीचा कायम आयडी इंडेक्स क्रमांकाची नोंद करावी लागले. त्यानंतर जलमापकाचे छायाचित्र प्राप्त होईल. त्यानंतर रीडिंगची नोंद अॅपवर नमुद करावे लागेल. नळकनेक्शन धारकाला त्याच्या मीटरची माहिती मिळेल. त्या माहितीची खात्री करून देयक मोबाईलवर अथवा मेलवर प्राप्त होईल. प्राप्त देयकानुसार, नळजोडणी धारकास ऑनलाइन अथवा www.nmctax.in या संकेतस्थळावरून भरणा करता येईल .

"महापालिकेच्या एनएमसी वॉटर टॅक्स ऑनलाइन अॅपचा शहरातील अधिकाधिक नागरिकांनी वापर करावा. ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर नळजोडणी धारकाला त्याचे बिल स्वतः प्राप्त करून घेत स्वतःच्या सोयीने घरबसल्या वीजबिल भरता येणार आहे."

- अर्चना तांबे, उपायुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT