nashik nmc esakal
नाशिक

Nashik : उत्पन्नवाढीसाठी महापालिका होर्डिंगसाठी भाड्याने देणार जागा

विनोद बेदरकर

नाशिक : शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर (Illegal hoardings) कारवाई करतानाच उत्पन्नवाढीसाठी महापालिकेचे (NMC) होर्डिंगसाठी जागा भाड्याने देऊन उत्पन्नवाढीचे (Increasing Income) नियोजन आहे. खासगी जागेवरील होर्डिंगमुळे महापालिकेला अपेक्षित कर मिळत नाही. त्यावर उपाय म्हणून आयुक्तांनी महापालिकेच्या (NMC Commissioner) जागा भाडे तत्त्वावर देऊन त्यातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. (NMC will lease space for hoarding to increase income Nashik News)

महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे (Encroachment Department) रहदारीस अडथळा निर्माण करणारे जाहिरात फलक काढण्यात आले आहे. अशीच आक्रमक भूमिका यापुढे कायम ठेवण्यासाठी आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात वाढ केली आहे. विविध बाजारपेठांतील वर्दळीच्या ठिकाणांवर रहदारीला अडथळा ठरतील असे जाहिरात फलक जप्त केले जात असून, संबंधित व्यावसायिकांवर कारवाईदेखील केली जाते आहे. आगामी काळातही अशाच स्वरूपात कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे ही कारवाई होत असली तरी अशा अनधिकृत होर्डिंगमुळे मनपाला उत्पन्न मिळत नाही.

त्याच बरोबर काही ठिकाणी खासगी जागांवर होर्डिंग उभारले जात आहेत. अशा होर्डिंगमधूनही कमी उत्पन्न मिळते. होर्डिंगच्या माध्यमातून मनपाचे उत्पन्न वाढावे, यासाठी जागा होर्डिंगसाठी भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. यासाठी होर्डिंग लावण्यासाठी संबंधित जाहिरात एजन्सीने शहरातील महापालिकांच्या जागा सुचवाव्यात व त्याची माहिती महापालिकेला दिल्यास त्या जागेवर होर्डिंग उभारण्यासाठी भाडे तत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT