Old Wadas
Old Wadas esakal
नाशिक

Nashik News: कारवाई सोडा, दुरुस्तीच्या नोटिसांचेही वावडे! पडके वाडे, जीर्ण इमारतींच्या NMCला वाकुल्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे. परंतु शहरात महापालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात १०७७ वाडे व जीर्ण इमारतींना वर्षानुवर्षं नोटिसा देण्याचा सोपस्कार फक्त पार पाडला जातो.

आजही जीर्ण अवस्थेतील या इमारती दिमाखात उभ्या असून कुठल्याही क्षणी कोसळू शकतात. परंतु, महापालिकेच्या यंत्रणांना कुठलेही सोयरसुतक नाही, उलट धोकादायक इमारती वाढत आहे. (no action after notices to Abandoned mansion dilapidated buildings old wada by nmc Nashik News)

धोकादायक इमारत

नाशिक महापालिका हद्दीत जवळपास ३१ गावठाणे असून या गावठाणामध्ये जुन्या इमारती व वाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे नवनगरांमध्येदेखील चाळीस वर्षांपेक्षा अधिक इमारतींची संख्या वाढत आहे.

गावठाणातील वाडे व इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहे. तर नवनगरांमधील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून वापरण्यायोग्य प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वापरात येणे शक्य आहे. गावठाणामध्ये पावसाळ्यात मोठ्या दुर्घटना घडतात.

यातून वित्त व जीवित हानी होते. महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून धोकादायक वाडे व इमारतींना नोटिसा पाठवल्या जातात. एकदा पावसाळा झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे- थे होते.

मात्र, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या धोका कायम राहतो. महापालिकेकडून तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारती व वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या व धोकादायक इमारती व वाड्यांमधील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

धोकादायक मालमत्ता संदर्भात दक्षता घेताना १०७७ वाडे व इमारतींची संयुक्त पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नगररचना विभागातील अधिकाऱ्यांसह विभागीय अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारती व वाड्यांमधील घरमालक व भाडेकरूंशी चर्चा करून धोकादायक इमारती उतरून घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६८ नुसार पोलिसांच्या मदतीने धोकादायक इमारती उतरवून घेण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली.

धोकादायक भाग कोसळून हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, अधिकाऱ्यांना इमारतीचा धोकादायक भाग व जीर्ण झालेल्या इमारती व वाडे निदर्शनास येऊनही धोकादायक उतरविण्याची तसदी घेतली गेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जीर्ण इमारतींच्या संख्येत वाढ

महापालिकेने केलेल्या संयुक्त पाहणीत १०७७ जीर्ण वाडे व इमारती आढळून आल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्याहून अधिक इमारती धोकादायक स्थितीत आहे. महापालिका हद्दीमध्ये जवळपास पावणेचार लाख मिळकती आहे.

यातील १९९० च्या दशकातीलच अडीच हजाराहून अधिक इमारती आहे. या इमारतींनी स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का, हे तपासण्याची यंत्रणा महापालिकेकडे असली तरी अशी कुठलेही पाहणी झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अडचणी समजून घेणे गरजेचे

वाडेमालक व भाडेकरूमध्ये तांत्रिक वाद आहे. वाड्यांवर भाडेकरूंनीही ताबा मिळविला आहे, तर वाडा विकसित करताना नियमाप्रमाणे भाडेकरूंनादेखील त्यांचा हिस्सा देणे गरजेचे आहे.

या दोन्ही वादात वाडे व जीर्ण इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. शासनाने गावठाण क्लस्टर योजना अमलात आणताना यातील अटी व शर्ती शिथिल केल्यास प्रश्न मार्गी लागणे शक्य आहे.

विभाग धोकादायक घरे व वाडे

पश्चिम ६००
पंचवटी १९८
पूर्व ११७
नाशिक रोड ६९
सातपूर ६८
सिडको २५
-------------------------------------
एकूण १,०७७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT