Ayushman Bharat Card esakal
नाशिक

ABHA Card News : आयुष्मान कार्ड वितरणात नाशिकचा भोपळा; मालेगाव अव्वल

सकाळ वृत्तसेवा

ABHA Card News : नाशिक जिल्ह्यात आयुष्मान कार्डासाठी भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत नाशिक, मालेगाव शहरासह १५ तालुक्यांत अंत्योदयचे तीन लाख ६३ हजार ९७, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे १९ लाख २९ हजार ९३३ लाभार्थी आहेत.

आयुष्मान कार्डसाठी एकूण लाभार्थी संख्या २२ लाख ९३ हजार ३० आहे. आयुष्मान कार्ड तयार करण्यात व वाटप करण्यात जिल्ह्यात मालेगाव तालुका अव्वल क्रमांकावर आहे. नाशिक शहरात एकही आयुष्मान कार्ड तयार झालेले नाही. (No Ayushman card has been prepared in Nashik news)

केंद्र व राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ यासह विविध उपक्रमांतून जास्तीत जास्त आयुष्मान कार्ड वितरण करण्याचा संकल्प केला आहे. हे कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका असलेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी असताना हा तालुकाही शुन्यावर अडकला आहे. इगतपुरीसह नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथेही याबाबत कामकाज झालेले नाही.

मालेगावच्या महसूल विभागाने पुढाकार घेतल्याने आयुष्मान कार्ड वितरणात सर्वाधिक आघाडी घेतली आहे.

प्रांताधिकारी नितीन सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी गावोगावी भेट देऊन आशा सेविका व स्वस्त धान्य दुकानदार यांना कार्ड तयार करण्यापासून वितरणाबाबत प्रोत्साहित केले. त्याची फलश्रुती तालुका अव्वलस्थानी असण्यात झाली.

मालेगाव तालुक्यात आयुष्मान कार्डसाठी अंत्योदयचे ११ हजार १४८, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे दोन लाख ४८ हजार १०४ लाभार्थी पात्र आहेत. यात अंत्योदयचे एक हजार ७५, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे नऊ हजार १८८ आयुष्मान कार्ड तयार करून या सर्व कार्डांचे वितरण करण्यात आले. याउलट शहरातील स्थिती आहे.

शहरात अंत्योदयचे १६ हजार ५४७, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे ३८ हजार ५९७ लाभार्थी संख्या आहे. यापैकी अंत्योदयचे ३४९ व प्राधान्य कुटुंब योजनेचे ४२५ आयुष्मान कार्ड तयार करून वितरित करण्यात आले आहे. नाशिक शहरात व जिल्ह्यात अंत्योदयचे तीन हजार २२६, तर प्राधान्य कुटुंबचे १३ हजार ६८३ आयुष्मान कार्डांचे वितरण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

Godavari gold search: पैठणमधील गोदावरीच्या पाण्यात सोन्या-चांदीचा शोध सुरू! चाळण्या-टोपल्या घेऊन शेकडो नागरिकांची गर्दी, व्हिडिओ पाहा

Road Accident Kolhapur: कोल्हापुरातील हातकणंगले–कुंभोज मार्गावर दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

Nagpur Crime: सख्ख्या भावाचे अत्याचार, १२ वर्षीय बहीण गर्भवती; मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून कृत्य

Malegaon Crime : मालेगाव पुन्हा हादरलं! 7 वर्षांच्या चिमुरडीसोबत नराधम अरिब अहमदचं संतापजनक कृत्य; संतापलेल्या नागरिकांनी भरचौकातच...

SCROLL FOR NEXT