Chandrakant Patil Meet Raj Thakceray 
नाशिक

राज ठाकरे आश्वासक नेते; त्यांची पन्नास भाषणे ऐकणार : चंद्रकांत पाटील

विनोद बेदरकर

नाशिक : राज ठाकरे हे महाराष्ट्रातील आश्वासक नेते आहेत, विद्यार्थी दशेपासून त्यांच्याशी परिचय आहे. त्यांच्याशी आज जी भेट झाली त्यात काही फक्त हवा पाण्यांची चर्चा झाली नाही तर, राजकिय चर्चा झाली. त्यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ घेतला जातो. अस राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मी स्वत: त्यांची चाळीस पन्नास भाषणे ऐकणार आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यात, काय चर्चा झाली याविषयी विचारले असता, पाटील बोलत होते. ते म्हणाले की, राज ठाकरे व आपल्यात काही फक्त हवा पाण्याच्या गप्पासोबत इतरही गप्पा झाल्या त्यात, राजकीय गप्पाही झाल्या. राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे तर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कामकाज करीत असल्यापासून म्हणजे आम्ही परस्परांना ४० वर्षापासून ओळखतो. त्यांची वोट बँक मोठी आहे. चेहरा आश्वासक आहे, पण परप्रांतीयांविषयीच्या त्यांची भूमिका बदलली पाहिजे. असे भाजपच मत आहे. तर स्वत: ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेविषयी चुकीच्या पध्दतीने मांडणी होते. असे त्याचे म्हणणे आहे म्हणून मी स्वत: आता त्यांची चाळीस ते पन्नास भाषणे ऐकणार आहे.

इंधनाचे राज्याने दर कमी करावे

राज्याने १० रुपयानी इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी पाटील यांनी केली. ते म्हणाले की, इंधनाचे दर केंद्र शासन ठरवित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन ते ठरतात. कच्या तेलाच्या आयतीनंतर केंद्राला प्रोसेसिंगचा खर्च येतो. राज्याला असा कुठलाही प्रोसेसिगचा खर्च येत नाही. त्यामुळे केंद्राने नव्हे तर राज्याने इधनाचे दर १० रुपयांनी कमी करायला पाहिजेत. अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच भेट झाली. त्यापूर्वी मोदी आणि उध्दव ठाकरे यांच्यात भेट झाली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीमुळे

महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळाची स्थिती नाही का याविषयी ते म्हणाले की, माझ्यामनात हा गोंधळ आहे. पण माझे गुरु यशवंतराव खेडकर तुझी खोली तू स्वच्छ ठेव इतरांच्या खोलीत डोकावू नको असे सांगितले. महाराष्ट्राच्या या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आमचे केंद्रातील नेते नरेंद्र मोदी व अमित शहा या दोन नेत्यावर सोपविली आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाबाबत लक्ष घालीत नसल्याचे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT