Uday-Samant.jpg 
नाशिक

'परीक्षेचा आराखडा नाही, तरीही समुपदेशन केंद्रांची यादी जारी!'...मग घाई कशासाठी?

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या सूचनांनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जिल्हास्तरावर मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र सुरू केले आहेत. परंतु परीक्षांचा आराखडाच अद्याप जाहीर केलेला नसताना समुपदेशन केंद्रांची यादी प्रसिद्ध केली. यातून विद्यापीठाच्या नाशिक, पुणे व नगर येथील एकूण नऊ केंद्रांवर रोज हजारो विद्यार्थी संपर्क साधत आहेत. परंतु ठोस आराखडा हाती नसल्याने प्रतीक्षा करण्याचा सल्ला संबंधितांना दिला जातो आहे. 

समुपदेशकांकडून संबंधितांना सबुरीचा सल्ला

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत परीक्षेविषयीचे धोरण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जाहीर केले होते. यानंतर विद्यापीठस्तरावर परीक्षांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देत समुपदेशनासाठी जिल्हास्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच परीक्षांसंदर्भातील वेळापत्रक विद्यापीठस्तरावर जारी करण्याचेही सूचविले होते. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्तरावर परीक्षाविषयीचे धोरण, आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. येत्या चार-सहा दिवसांत परीक्षेचे वेळापत्रक व संभाव्य शंकांचे निरसन करण्यासाठीची माहिती विद्यापीठ स्तरावरून उपलब्ध करून दिली जाणार आहे. तत्पुर्वी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्याची घाई विद्यापीठाने केली. सोमवारी (ता. 11) परिपत्रक जारी करत या केंद्रांचे संपर्क क्रमांक विद्यापीठाने उपलब्ध करून दिले होते. या प्रत्येक केंद्राला रोजचे दीडशे ते तीनशे विद्यार्थी, पालक किंवा अन्य व्यक्‍तींकडून संपर्क साधला जातो आहे. परंतु हातात ठोस माहिती उपलब्ध नसल्याने केंद्रावर तैनात समुपदेशकांकडून संबंधितांना सबुरीचा सल्ला दिला जात आहे. 
 
...मग घाई कशासाठी 

विद्यापीठातर्फे परीक्षाविषयक आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच समुपदेशन केंद्र कार्यान्वित केले आहेत. या केंद्रांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी संपर्क करत आहेत. परंतु केंद्रावरील मनुष्यबळाकडे ठोस माहिती उपलब्ध करून न देता केंद्र कार्यान्वित करण्याची घाई कशासाठी, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होतो आहे. ठोस तारखा हाती नसल्याने सध्या श्री. सामंत यांनी जाहीर केलेल्या घोषणांविषयीची माहिती संपर्क साधणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जात आहे. 

नऊ समुपदेशन केंद्र 

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पुणे जिल्ह्यात चार महाविद्यालयांत केंद्र आहे. नगर जिल्ह्यात तीन केंद्र आहेत. नाशिकला केटीएचएम महाविद्यालय व के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्राचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

Pune News: भाजप इच्छुकांच्या स्वप्नांना कात्री; पुण्यात स्वीकृत नगरसेवकांना पाच वर्षांचे नियुक्ती प्रमाणपत्र, नव्याने प्रक्रिया हाेणार!

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Beed District News: कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ‘शेती शाळा’; शेतकऱ्यांना बांधावरच हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

Maharashtra River Pollution: नद्या प्रदूषण रोखण्यासाठी प्राधिकरण; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, दोन हजार कोटींचा निधी उभारणार, काेणत्या नद्या स्वच्छ हाेणार?

SCROLL FOR NEXT