no helmet no petrol
no helmet no petrol esakal
नाशिक

हेल्मेट असेल तरच मिळणार पेट्रोल! पोलीसांचे असेल लक्ष

विनोद बेदरकर

नाशिक : अपघातात जीव वाचविण्यासाठी हेल्मेट सक्तीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन, कायदा करूनही अंमलबजावणी होत नाही. मात्र, आता नाशिकला शहर पोलिस आणि पेट्रोलपंप असोसिएशन यांनी एकत्र येऊन हेल्मेट असेल तरच पेट्रोल मिळणार, असा नवा नियम केला आहे. त्यामुळे नाशिकला यापुढे हेल्मेटविना पेट्रोल मिळणार नाही. (No-Helmet-No-Patrol-policy-Decision-of-Police-Patrol-Association-jpd93)

हेल्मेट असेल तरच मिळणार पेट्रोल!

जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरणाला पाठिंबा देत प्रस्तावित निर्णयाबाबत चर्चा केली. हेल्मेटचा निर्णय चालकांच्या हितासाठी असल्याने सोमवारी (ता. २६) बैठक होऊन त्यात एकमताने निर्णय घेण्याचे ठरले. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त नवलनाथ तांबे, पेट्रोल डीलर असोसिएशनचे नितीन धात्रक, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विजय ठाकरे, जिल्हाध्यक्ष भूषण भोसले, सचिव सुदर्शन पाटील, तेहसीन खान, हेमचंद्र मोरे, दिनेश धात्रक आदी उपस्थित होते. त्यामुळे लवकरच याविषयीचा आदेश निघण्याची शक्यता आहे.

अपघातांची मालिका

गेल्या काही वर्षांतील दुचाकीवरील झालेले अपघातांचे प्रमाण मोठे असून, मृत्यूची आकडेवारी काळजी करायला लावणारी आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या निर्णयाला पाठिंबा देत पेट्रोल डीलर असोसिएशने वाहतूक नियंत्रित व सुरळीत सुरू ठेवण्याची असल्याने रस्त्यात अडवणूक करून हेल्मेटबाबत कारवाई न करता पेट्रोलपंपवर ग्राहकांना आवाहन करून कठोर हेल्मेटसक्तीच्या उपाययोजनेला मन्यता दिली. तसेच देशभरातील अनेक शहरांत अपयशी ठरलेल्या या योजनेला नाशिकला यशश्वी करण्याचे ठरले. डीलर्स प्रतिनिधींनी जे नागरिक ऐकणार नाहीत, पेट्रोलपंपावर कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करतील अशांबाबतीत पोलिसांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

देशात विविध शहरांत जरी हेल्मेटसक्ती निर्णयाच्या अंमलबजावणीला अपयश आले असले, तरी नाशिकला मात्र पेट्रोल डीलर असोसिएशनच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो. येथील नागरिकही हा निर्णय सकारात्मक पद्धतीने घेऊन शहराचा लौकिक जपतील. -दीपक पांडे, पोलिस आयुक्त

हेल्मेटसक्ती हा सामान्यांच्या हितासाठी निर्णय आहे. पेट्रोल डीलर असोसिएशन यात सहभागी असून, पोलिसांकडून प्रत्येक पेट्रोलपंपावर आवश्यक त्या संख्येने पोलिस कर्मचारी नेमले जाणार आहेत. पेट्रोलबाबत नागरिकांची एकदम गैरसोय होणार नाही. याचादेखील विचार करण्यात आलेला आहे. -सुदर्शन पाटील, सचिव, नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT