rice sakal
नाशिक

घोटी : भात खरेदीला मुहूर्त सापडेना!

आदिवासी विकासची हालचाल नाही : अनुदानाचा निर्णयही प्रलंबित

गोपाळ शिंदे

घोटी : अवकाळी पावसाने इगतपुरी तालुक्यात भाताचे (धान) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यातून वाचत शेतकऱ्यांची धान कापणीची लगबग सुरू असताना दुसरीकडे मात्र आदिवासी विकास विभागाने अजूनही धान खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत. तसेच अनुदानही घोषित केलेले नाही, त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला आहे. याबाबत लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने त्यांच्या संतापात भरच पडली आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानीतून वाचलेला भात विकून दोन पैसे हाती येतील ही शेतकऱ्यांची आशा प्रशासनाच्या कासवगतीमुळे धुळीस मिळतात की काय अशी स्थिती झाली आहे. गेल्यावर्षी आदिवासी विकास विभागाने विक्रमी धान खरेदी केली. त्यासाठी आधीच नियोजन केले होते, मात्र यंदा अजूनही तशा हालचाली नाहीत. धान खरेदीचा शुभारंभ कधी होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. वर्षभर राखून ठेवलेले धान व आत्ताचे धान कशाच्या भरवशावर विकायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या आदिवासी भागात केवळ वीस टक्के धान कापणी शिल्लक राहिली आहे. जवळपास सर्वच भागात धान कापणी शेवटच्या टप्प्यात आली आहे.

शेतकऱ्यांना न्याय देणारे आणि शेतकरी नेते म्हणून मिरवणारे सध्या कुठे गायब झाले आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केवळ भंपक घोषणाबाजी करणाऱ्यांनी या प्रश्नी आवाज उठविण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हंगाम संपत येऊनही धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच आहेत.

नेतृत्व राहिले की नाही ?

इगतपुरी तालुक्यात नेतृत्वाची आबाळ झाली की काय? बेरोजगार युवक, शेतकरी कष्टकरी, मजूर यांच्यासाठी ज्या तालुक्यातील दमदार (स्व.) नेत्यांनी धरणे आंदोलन करीत तत्कालिन सरकारला जेलभरो आंदोलनाने घाम फोडला होता. आज मात्र ती परिस्थिती दिसून येत नाही. केवळ आपापल्या गटावर लक्ष केंद्रीत करून निवेदने देत शेतकऱ्यांची दिशाभूल करणे सुरू असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील आरोपीवर सर्व सात गुन्हे सिद्ध झालेत- न्यायाधीश

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Malware Alert : लॅपटॉप-कॉम्प्युटरवर WhatsApp वापरताय? CERT-In ने दिला गंभीर इशारा, 'हा' मेसेज बघताच बँक अकाउंट होईल रिकामं

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

SCROLL FOR NEXT