satish kulkarni
satish kulkarni  Google
नाशिक

शहरात पाणी कपात होणे नाहीच! - महापौर कुलकर्णी

विक्रांत मते

महापौर सतीश कुलकर्णी यांनी गंगापूर धरणातील पाणी साठ्याची पाहणी करून पाणी कपात होणार नसल्याचा स्पष्ट शब्द नाशिककरांना दिला आहे.

नाशिक : अंदमान व निकोबार बेटावर मॉन्सूनचे आगमन, गंगापूर धरण (Gangapur Dam) समूहात शिल्लक असलेला ४७ टक्के पाणीसाठा या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून पाणी कपातीचा रेटा लावला जात असला तरी महापौर सतीश कुलकर्णी यांनी गंगापूर धरणातील पाणी साठ्याची पाहणी करून पाणी कपात होणार नसल्याचा स्पष्ट शब्द नाशिककरांना दिला आहे. पाणीसाठा समाधानकारक असला तरी याचा अर्थ पाण्याची उधळपट्टी नको, पाणी जपून वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. (no water cut in the nashik city)

पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा

शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दारणा धरणात यंदा ४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अळी व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गंगापूर व मुकणे धरणातून पाणी उचलले. गंगापूर धरणात आरक्षित पाण्याचा विचार करता अधिक पाणी उचलता येत नसल्याने पंधरा दिवसांचा तुटवडा भासू शकतो, असा अंदाज लावत दिवसातील एक वेळ किंवा वीस ते २५ मिनिटे पाणी कपात करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष शिवसेनेने त्यास विरोध दर्शविला होता. त्यानंतरही छुपी पाणी कपात सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत होत्या. या पार्श्‍वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी गंगापूर धरण समूहातील पाण्याची सद्यःस्थिती काय आहे, याची पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला होता.


गंगापूर धरणात समूहातील सध्याचा पाणीसाठा, धरणात सद्य:परिस्थितीत ४७ टक्के इतका पाणीसाठा असल्याने पावसाळ्यापर्यंत पुरेसा असल्याचे मत व्यक्त करत महापौर कुलकर्णी यांनी पाणी कपात होणार नसल्याचे जाहीर केल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला.
या वेळी सभागृह नेते सतीश सोनवणे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता एस. एम. चव्हाणके, अविनाश धनाईत, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ उपस्थित होते.

''धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने पाणी कपात करण्याची आवश्यकता नाही, नागरिकांनी तरीही पाणी जपून वापरावे.''
- सतीश कुलकर्णी, महापौर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT