DJ Performance in Ganeshotsav 2023 Procession esakal
नाशिक

Nashik: पोलिसांच्या नाकावर टिच्चून विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट! शांतता समितीच्या सदस्यांकडूनच आदेश पायदळी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ganeshotsav 2023 : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर ठेवत आणि शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे वाजविण्यावर बंदी असताना शांतता समिती आणि गणेश महामंडळाचे पदाधिकाऱ्यांकडूनच विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट केला.

याबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद तर डीजे वाजविणाऱ्या मंडळांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. डीजे वाजविणाऱ्या मंडळांना नेमका कोणाचा आशीर्वाद मिळाला, अशी चर्चा रंगली होती. (noise of DJ in immersion procession police Orders surpassed by members of Peace Committee Nashik)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वाजविण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी राज्यातच नव्हे तर देशभरात आहे. तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच शहर पोलिसांनी शांतता समितीच्या बैठका घेत डीजे नवाजविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाईचाही इशारा दिला होता.

पोलिसांच्या या सूचनांना शांतता समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या गणेश मंडळांच्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी संमतीही दिली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून शहराच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे न वाजविण्याची परंपरा कायम राहील असे संकेत होते.

मात्र विसर्जन मिरवणुकीतील आठ मंडळांनी डीजेचा दणदणाट करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसविले, तर पोलिसांच्या नाकावर डीजे वाजवीला. यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

गुन्हे दाखल होणार का?

रवींद्र कुमार सिंगल हे पोलीस आयुक्त असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत दंडे हनुमान मित्र मंडळाने डीजे वाजविला होता. या प्रकरणी गजानन शेलार यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविला नव्हता, यावेळी मात्र त्या मंडळासह आठ मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. त्यामुळे पोलिसांच्या आदेशाला न जुमानता ज्या मंडळांनी आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या विरोधात पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT