JalJeevan Mission esakal
नाशिक

Jal Jeevan Work : अजबच! जलजीवनच्या कामांमध्ये गावकऱ्यांचे असहकार्य; कानळद ग्रामपंचायतीतील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे सुरू करताना काही ग्रामपंचायतींकडून अडवणूक केली जात आहे. निफाड तालुक्यातील कानळदच्या सरपंचाने तर ठेकेदाराला पत्र देत आमच्या ग्रामपंचायतीने कोणतीही पाणीयोजना प्रस्तावित केलेली नाही.

आपणास ग्रामपंचायतीकडे काही काम असल्यास पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा, असे उत्तर दिले आहे. (Non cooperation of villagers in Kanald Gram Panchayat in jal jeevan mission work nashik news)

कामाचे कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर ठेकेदार संबंधित ग्रामपंचायतींशी पत्रव्यवहार करून तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.

कानळद येथे ठेकेदाराने ग्रामपंचायतीला पत्र पाठवून त्यांना गोदावरी कालव्यावर या योजनेसाठी पाणी आरक्षित करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे मागणी करण्यासाठी तीन प्रतित प्रस्ताव तयार करावा, असे पत्र मागील आठवड्यात दिले.

मात्र सरपंचांनी चार ओळींचे उत्तर देत कानळद पाणीयोजना नावाची काहीही योजना ग्रामपंचायतीने प्रस्तावित केली नाही, असे स्पष्ट केले. मुळात जलसंपदा विभागाला देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची असताना सरपंचांच्या या उत्तराने ठेकेदार अवाक झाले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यामुळे या प्रस्तावांबाबत ग्रामसेवकाने पुढाकार घ्यावा, असे पत्र आता जिल्हा परिषेदने देण्याची वेळ आली आहे. तसे झाल्यास ग्रामसेवक, ठेकेदार आणि सरपंच असा सुसंवाद होऊन कामे लवकर मार्गी लागू शकतील, असे ठेकदारांनी सांगितले.

दरम्यान, सरपंचच असे सांगत असतील तर योजना घेताना सरपंचांना विश्‍वात घेतले नाही काय, असाही प्रश्‍न निर्माण होतो. याबाबत सरपंचांनी मागे केलेल्या तक्रारीत तथ्य होते, असे म्हणण्यासह वाव राहतो. त्यामुळे हा प्रश्‍न तातडीने निकाली निघावा, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT