Booster Dose esakal
नाशिक

बूस्टर डोस तर सोडाचं, दुसऱ्याला डोसलाच प्रतिसाद अल्प

विक्रांत मते

नाशिक : ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाला (Corona) धुडकावत तिसरी लाट आटोक्यात आणली असली, तरी लसीकरणाच्या बाबतीत मात्र मोठा धोका स्वीकारला आहे. पहिल्या लाटेने भीती निर्माण केल्याने लस उपलब्ध झाल्यानंतर टोचणाचा धडाका लावला. परंतु दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक डोस मात्र तेवढ्या प्रमाणात घेतला गेला नाही, असे जिल्हा परिषदेच्या (ZP) आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

करोना महामारी ने मार्च २०२० पासून शहरासह ग्रामीण भागात हात पाय पसरले. पहिल्या व दुसऱ्या लाटेत जवळपास एक लाख ५८ हजार २७७ कोविड रुग्ण आढळले. पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने तिसरी लाट दोन्ही लाटांपेक्षा भयानक असेल, असे संकेत दिले जात होते. परंतु परिस्थिती उलट झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातही आदिवासी भागात कोविड स्थिती असून नसल्यासारखे असल्याचे दिसून आले. दरम्यान पहिल्या लाटेनंतर राज्य सरकार मार्फत प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination) सुरु करण्यात आले.

प्रथम आरोग्य व वैद्यकीय सेवा देणारे तसेच सरकारी कर्मचारी अशा कोविड योध्यांना लस टोचण्यात आली. त्यानंतर साठ वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम आखण्यात आला. त्यानंतर ४५ ते ६० वयोगटासाठी लसीकरणाची मोहीम आखण्यात आली. शहरा बरोबरच ग्रामीण भागात ग्रामीण आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण केले गेले. पहिल्या डोसला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. पहिल्या लाटेत तीस लाख ३४ हजार २४५ नागरिकांना लस देण्यात आली. एकूण ९१.५१ टक्के लसीकरण झाले. त्यानंतर दुसऱ्या डोसला मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पंचवीस लाख २९ हजार ९८९ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे. त्याची एकूण टक्केवारी ७६.३० टक्के आहे.

बूस्टर डोसला अल्प प्रतिसाद

दोन डोसला बूस्टर करण्यासाठी तिसऱ्या डोसचे नियोजन करण्यात आले. आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून बूस्टर डोसची (Booster dose) व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु जिल्हा भरात अवघे ५२ हजार ६२५ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. लोकसंख्येचा विचार करता टक्केवारीत हे प्रमाण पाच टक्क्यांच्या आसपास आहे. नाशिक तालुक्यात बार हजार ९४७ लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे.

तालुकानिहाय पहिला, दुसरा डोस (कंसात टक्केवारी)

तालुका पहिला डोस दुसरा डोस

नाशिक २,१२,१९७ (९६.२७) १,९१,०२५ (८६.६७)

दिंडोरी २,४५,४६१ (९३.१७) २,२६,६४४ (८६.०३)

त्र्यंबक १,२८,५९० (९०.६३) १,०६,४१३ (७५)

इगतपुरी १,८६,०८४ (९३.१९) १,४७,७९० (७४.०१)

निफाड ३,४८,७२८ (८८.१५) ३,३३,१५८ (८४.२१)

चांदवड १,७४,२६३ (९१.४९) १,४०,७२५ (७३.८८)

सिन्नर २,६४,२०० (९१.६२) २,३१,५४६ (८०.३०)

कळवण १,६५,५४२ (९२.५९) १,२९,६०९ (७२.४९)

मालेगाव २,७०,९३८ (९१.५६) २,२८,६३८ (७७.२६)

पेठ ९३,०१३ (९३.१२) ७६,११९ (७६.२१)

देवळा १,०८,५४८ (९३.२३) १०,०६४४ (८६.४५)

बागलाण २,९०,१३४ (९२.४९) २,३५,२५२ (७४.९९)

येवला १,८८,७५६ (८५.८३) १,३९,५२८ (६३.४५)

नांदगाव २,२३,००४ (९१.०९) १,५५,९२१ (६३.६९)

सुरगाणा १,३४,७८७ (९२.०८) ८६,९७८ (५९.४२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजप उमेदवाराला लोकांनी घरातच कोंडलं

Akol crime: अकोल्यात रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगलानं संपवलं जीवन; सरत्या वर्षाला निरोप अन् उचलले टोकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय...

Daily Good Habits: मन फ्रेश अन् अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ कानमंत्र पाळा, तणाव होईल गायब

SCROLL FOR NEXT