nmc2.jpg 
नाशिक

थकबाकीदारांना दिलासा! १ नोव्हेंबरपासून शास्तीच्या रकमेत ७५ टक्क्यांपर्यंत सवलत

विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे अपेक्षित वसुली होत नसल्याने महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा निर्णय घेतला असून, १ नोव्हेंबरपासून योजना अमलात आणली जाईल. 

शास्तीच्या रकमेत ७५ टक्क्यांपर्यंत सवलत 

महापालिका उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या घरपट्टीतून यंदा अपेक्षित वसुली झाली नाही. नियमित व थकबाकी मिळून तीनशे कोटींच्या वर महसुलाची वसुली होणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षात ६१.९६ लाख रुपये वसुली झाली. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षात पाणीपट्टीचे १०७ कोटींचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यांपैकी अवघे १५.७८ कोटी रुपये वसूल झाले. पाणीपट्टीची ७२.८२ कोटींची थकबाकी आहे. तीन टप्प्यांत योजना राबविली जाणार असून, १ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत थकबाकी अदा केल्यास शास्तीवर ७५ टक्के सवलत दिली जाईल. १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५० टक्के, तर १६ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत २५ टक्के सवलत दिली जाईल. 
थकबाकीदार वाढले. 

मागील वर्षाच्या तुलनेत घरपट्टी थकबाकीदारांची संख्या वाढली आहे. २५ हजार ते एक लाख रुपये थकबाकी असलेले ११ हजार ६४० थकबाकीदार, तर एक लाखापेक्षा अधिक थकबाकीदार असलेले दोन हजार ६३१ थकबाकीदार आहेत. अभय योजनेचा कालावधी संपल्यानंतर महापालिकेकडून जप्तीची मोहीम राबविली जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT