NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar latest marathi news esakal
नाशिक

Nashik : आता सुट्टीच्या दिवशी ‘HOD'; अधिकारी कामकाजात बदल

विक्रांत मते

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून आठवड्याच्या सुरवातीला म्हणजे सोमवारी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्याच्या परंपरेला नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फाटा देत सुटीच्या दिवशी म्हणजे पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी विभाग प्रमुखांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Now HOD on holiday Change in nmc Officer Duties Nashik latest marathi news)

नवनियुक्त आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी महापालिकेच्या कामकाजाच्या पद्धतीत बदल करताना महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दर सोमवारी होणारी विभाग प्रमुखांची बैठक दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाच आठवड्यांचा महिना असल्यास तिसऱ्या शनिवारी बैठक घेतली जाणार आहे. हा निर्णय घेण्यामागे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत नागरिकांना अधिक वेळ देऊन कामकाजात सुटसुटीतपणा आणणे, हा उद्देश असल्याचे आयुक्त पुलकुंडवार यांनी सांगितले.

यापूर्वी दर सोमवारी मीटिंग होत होती. त्या वेळी अर्धा दिवस अधिकाऱ्यांचा मीटिंगमध्ये जात होता. माजी आयुक्त रमेश पवार यांनी एकाच वेळी अधिकाऱ्यांची बैठक घेण्या ऐवजी विभागनिहाय बैठक घेतल्याने यातून अधिकाऱ्यांना नागरिकांसाठी अधिक वेळ देता येत होता. आता त्यात पुन्हा नव्याने व सोईस्कर बदल झाला असून, आता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अधिकाऱ्यांची बैठक होणार नाही. सुटीच्या दिवशी बैठक होणार आहे.

अधिकारी वर्ग समाधानी

आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सुट्टीच्या दिवशी साप्ताहिक बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले. सुट्टीच्या दिवशी दोन ते अडीच तास देणे अवघड नाही. उलट ताण-तणाव विरहित बैठक होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. तर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी गावी जाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मात्र थोडी खुशी, थोडा गम असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

SCROLL FOR NEXT