girish mahajan.jpg 
नाशिक

VIDEO : गिरीश महाजन म्हणतायत...'सरकारने कोरोनाबाधितांचे आकडे लपविण्याच्या भानगडीत पडू नये'

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राज्यात नियोजनाच्या अभावामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय...कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आकडे लपवत आहे, असे आरोप भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या वर्षपूर्ती अभियानानिमित्त भाजप कार्यालयात रविवार (ता. 7) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही

कोरोनाशी संघर्ष करण्यासाठी केंद्राने काय दिले? याबद्दलची बरीच चर्चा झाली, परंतु केंद्राची मोठी मदत मिळाली आहे, असे सांगून श्री. महाजन म्हणाले, की कोरोना संशयितांचे स्वॅब घेऊन योग्य तपासणी करायला हवी, पण तसे घडत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका दिसतोय. शिवाय मालेगावमधील कोरोनाबाधित रुग्णांची खरी आकडेवारी अजूनही पुढे येत नाही. जळगावमध्ये तपासणीचा अहवाल येण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागतोय. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. लोकांचे मृत्यू होताहेत असेही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, खासदार डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

लांबपल्याच्या निर्णयाचा दाखला 

श्री. मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात रोजगारनिर्मिती आणि विकासदर कमी राहणे हे प्रश्‍न कायम राहिलेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. महाजन यांनी केंद्राने घेतलेल्या लांबपल्याच्या निर्णयाचा दाखला देत त्याचे चांगले परिणाम दिसायला वेळ लागेल असे स्पष्ट केले. 

सोनू सूदचे काय चुकले? 

कलावंत सोनू सूद यांनी मदत केली त्यात त्यांचे काय चुकले? त्यात वावगे काय? असे प्रश्‍न श्री. महाजन यांनी उपस्थित केले. तसेच आम्ही काय करणार नाही हे योग्य नाही, अशी टिप्पणी राज्य सरकारवर त्यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam: कॉपी करणाऱ्यांची आता खैर नाही! दहावी–बारावीच्या परीक्षा हायटेक पद्धतीने होणार; महाराष्ट्र बोर्डचा मोठा निर्णय

Virat Kohli's World Record: कोहलीचा 'विराट' पराक्रम, नावावर केला विश्वविक्रम; क्रिकेट विश्वातील दिग्गजाला मागे सोडले

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार? सर्वात मोठी अपडेट, कुणी केली मागणी?

Latest Marathi News Live Update : शरद पवार हे आगामी काळात एनडीएमध्ये सामील होऊ शकतात मंत्री संजय शिरसाठ यांचे विधान

Crime News : इन्स्टाग्रामवर ओळख, प्रेमसंबंधाला नकार देताच तरुणीवर हल्ला; भररस्त्यात तरुणाने तिचे कपडे फाडण्याचा केला प्रयत्न

SCROLL FOR NEXT