corona patients esakal
नाशिक

नाशिकमध्ये 'मे'मध्ये घटले ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण; कठोर निर्बंधांने शक्य

अरूण मलाणी

नाशिक : गेल्‍या महिन्‍यात एप्रिलमध्ये कोरोना प्रादुर्भावाने (coronavirus) त्रस्‍त झालेल्‍या जिल्‍हावासीयांसाठी मे महिना दिलासादायक राहिला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्‍य शासनाने निर्बंध (lockdown) लागू केले होते. त्‍यातच जिल्‍हा प्रशासनाने १२ ते २३ मेदरम्‍यान लागू केलेल्‍या कठोर निर्बंधांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍याचे बोलले जात आहे. प्रशासकीय यंत्रणेच्‍या शर्तीच्‍या प्रयत्‍नांमुळे नाशिक ‘रेड झोन’मधून (red zone) बाहेर आले. यातून मंगळवार (ता. १)पासून जिल्‍ह्यातील निर्बंध शिथिल होत आहेत. (number-of-active-patients-decreased-in-May-Nashik-marathi-news)

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत मोठी घट

मे मध्ये ६१ हजार ९१६ कोरोनाबाधित आढळले असून, ९१ हजार ९२४ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत तब्‍बल ३१ हजार २३५ ने घट झाली. गेल्‍या ३० एप्रिलला जिल्‍ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुणांची संख्या ४० हजार ८१६ होती. मेमध्ये नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटताना, कोरोनामुक्‍त रुग्‍णांच्‍या संख्येत सातत्‍याने वाढ झाली. यामुळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत मोठी घट झाली. सोमवारी (ता. ३१) जिल्‍ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या नऊ हजार ५८१ पर्यंत खाली आली होती.

महिन्‍याभरात एक हजार २२७ मृत्‍यू

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना कोरोनाबळींची संख्या चिंता वाढविणारी ठरली. एक दिवसाचा अपवाद वगळता मेमधील उर्वरित ३० दिवस मृतांची संख्या तीसपेक्षा अधिक राहिली. तीनवेळा या संख्येने पन्नासचा आकडाही ओलांडला. महिनाभरात एक हजार २२७ मृत्‍यूंची नोंद झाली असून, या महिन्‍यातील मृत्‍युदर १.९८ राहिला.

पॉझिटिव्हिटी रेट घटला, रिकव्‍हरी रेट वाढला

चाचण्यांच्‍या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचा दर अर्थात, पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाली. दुसरीकडे कोरोनामुक्‍त रुग्‍णांच्‍या संख्येत वाढ झाल्‍याने रिकव्‍हरी रेट वाढला. एप्रिलअखेर जिल्‍ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २६.६४, तर रिकव्‍हरी रेट ८६.३२ टक्‍के होता. मेअखेर यात बदल होऊन पॉझिटिव्हिटी रेट २३.४८ झाला, तर रिकव्‍हरी रेट ९६.२९ वर पोचला. मेमधील पॉझिटिव्‍ही रेट १४.४९ टक्‍के राहिला.

मेमधील कोरोनाविषयक ठळक बाबी..

* जिल्‍ह्यात चार लाख २७ हजार २८२ चाचण्या

* चाळीशीच्‍या आतील ३७ हजार ७५ पॉझिटिव्‍ह

* एकसष्टी ओलांडलेल्‍या सात हजार १७५ नागरिकांना लागण

* मृतांमध्ये चाळिशीपुढील बाधितांचे प्रमाणच अधिक

मेमध्ये वयोगटनिहाय बाधित, मृतांचा तपशील असा

वयोगट पॉझिटिव्‍ह मृत्‍यू

०-१२ ३,२७८ ०

१३-२५ ११,४५० १६

२६-४० २२,३४७ १७५

४१-६० १७,६६६ ५४०

६१ पुढील ७,१७५ ४९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Lift Accident: १२ वर्षांचा पोटचा गोळा गेला, आई पोरकी झाली... पिंपरीत मुलगा लिफ्टमध्ये कसा अडकला? काय घडलं होतं?

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Latest Marathi News Live Update : ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

100 Years Of RSS: रेशीम बागेत चैतन्य अन्‌ उत्साह; संघ शताब्दी विजयादशमीला हजारो स्वयंसेवकांची गर्दी

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजाने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड! आता 'हिटमॅन'चा विक्रम संकटात; ध्रुव जुरेलसह शतकी भागीदारी

SCROLL FOR NEXT