water tanker esakal
नाशिक

Water Tanker : जिल्ह्यात टँकरची संख्या वाढली; 76 हजारांवर लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर

सकाळ वृत्तसेवा

Water Tanker : वाढत्या उन्हाच्या कडाक्यासोबत टँकरची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५२ गावे आणि ४० वाड्यांवरील ७६ हजार ६६ लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.

सर्वाधीक ३४ टँकर येवला तालुक्यात सुरु आहेत. (number of tankers increased in district 76 thousand population on tanker water nashik news)

येवला, मालेगाव, इगतपुरी, बागलाण, चांदवड, देवळा, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. पश्‍चिम पट्ट्यातील जादा पावसाचे तालुकेही टंचाई स्थितीला अपवाद नाहीत.

उलट जलस्त्रोत कमी झाल्याने पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्यांमधील गावांत टँकरची मागणी सुरु आहे. प्रशासनाने पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी आतापर्यंत ३१ विहीरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात सर्वाधीक ११ अधिग्रहित विहीरी मालेगाव तालुक्यात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर, सर्वाधीक टँकर येवला तालुक्यात सुरु आहेत. येवला तालुक्यात २५ गावे आणि ९ वाड्यांवर ३१ हजार १५६ लोकसंख्येला ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात ७ गावे व ८ वाड्यांसह १५ ठिकाणी २० हजार ८५६ लोकसंख्येला १६ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

चांदवड तालुक्यात ७ गावांतील ११ हजार लोकसंख्येला १४ टँकरने, इगतपुरी तालुक्यात १९ ठिकाणी ७ हजार १२८ लोकसंख्येला १३ टँकरने, तर बागलाण तालुक्यात ८ गावांतील अकराशे लोकसंख्येला ११ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT