Nylon manja esakal
नाशिक

Nylon Manja : नायलॉन मांजापासून नागरिकांच्या संरक्षणासाठी सरसावला अवलिया; लावली गजब आयडिया

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : नायलॉन मांजाच्या फासापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्रवीण जाधव नामक अवलिया पुढे सरसावला आहे. त्यांच्याकडून स्वखर्चातून मदत केली जात आहे. नायलॉन मांजामुळे शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी दुर्घटना होण्याच्या घटना घडत आहे.

शहरातही चार ते पाच घटनांमध्ये मांजाचा फास लागल्याने नागरिक जखमी झाले आहे. विशेष करून दुचाकीवरून जाणाऱ्यांच्या गळा चिरण्याच्या घटना अधिक घडत आहे.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

अशा दुर्घटना आळा बसण्यासाठी विनयनगरी येथील प्रवीण जाधव यांनी त्यांच्या गर्जना युवक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दुचाकी चालकांसाठी मोफत संरक्षण तार लावून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. प्रतिष्ठानच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्वखर्चातून दुचाकीच्या दर्शनी भागावर मोफत तार बसवून दिली जात आहे.

दुचाकीवरून जात असताना अचानक मांजा आला तरी त्या तारेत अडकून मांजा तुटला जाईल. किंवा मग वरच्या बाजूने सरकून जाईल. जेणेकरून चालकाच्या गळ्यापर्यंत मांजा पोचणार नाही. ज्यांना तार बसून घ्यायची आहे. त्यांच्या संपर्कासाठी सोशल मीडियावर मोबाईल क्रमांक प्रसारित केला आहे.

पहिल्याच दिवशी २० ते २५ दुचाकी चालकांनी उपक्रमाची संधी सादत त्यांच्या दुचाकीवर तार बसवून घेतली. संक्रांतीपर्यंत असा उपक्रम सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय नायलॉन मांजा जखमी झालेल्या व्यक्ती त्यांच्या नजरेत पडल्यास त्यांना उपचारात रुग्णालयात दाखल करण्याचेदेखील समाजकार्य त्यांच्याकडून केले जात आहे.

यामुळे घेतला निर्णय

जाधव काही दिवसांपूर्वी गोदावरी नदी गौरी पटांगण येथून जात होते. अचानक त्यांची नजर एका ज्येष्ठ नागरिकावर पडली. त्यांच्या पायात नायलॉन मांजा अडकल्याने पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. श्री. जाधव यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याशिवाय दुचाकीचालकांच्या संरक्षणासाठी संरक्षण तार बसविण्याचा निर्णय घेतला. सोमवार (ता. ९) सुरवात करून दुचाकीवर संरक्षण तार बसविल्या.

''नागरिकांनी दुचाकी चालवताना काळजी घ्यावी. शिवाय ज्यांना तार बसून घ्यायची आहे, त्यांनी संपर्क साधावा. संक्रांत झाल्यानंतरदेखील तीन ते चार दिवस तार काढू नये.'' - प्रवीण जाधव, अध्यक्ष, गर्जना युवा प्रतिष्ठान संस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : 'करो वा मरो' सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरली! वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंसह उतरणार?

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

ड्रग्स प्रकरणात अडकली, संन्यासी होण्याची हौस फिटली ! 25 वर्षांनी अभिनेत्रीचा टीव्हीवर कमबॅक

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT