Sandhya Keshe 
नाशिक

'ओ शेऽऽऽठ'चा धुमाकूळ सुरुच! नाशिकची संगीतकार संध्या पोहचली घराघरांत

तुषार महाले

नाशिक : सध्या सोशल मीडियावर ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय ग्रेट’ धूम करत आहे. गीतरचनेबरोबरच संगीत देण्याचे काम नाशिकच्या संध्या केशे यांनी केले आहे. या थिरकणाऱ्या गाण्याच्या माध्यमातून संध्या केशे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली आहे. (O Sheth song gave Nashik-based musician Sandhya Keshe a recognition)

ओ शेठ या सोशल माध्यमावरील कमेंटमध्ये लिहिल्या जाणाऱ्या प्रचलित शब्दावर गाणे तयार झाले आहे. नाशिकच्या संध्या केशेने ओ शेठ या एका शब्दावर गाणे अवघ्या अडीच तासांत लिहिले असून, संध्या केशे-प्रनिकेत खुने या जोडीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. नाशिकची संध्या आणि उस्मानाबादच्या प्रनिकेतची जोडी चार वर्षांपासून एकत्र काम करत असून, त्यांनी जवळपास ५० गाण्यांवर काम केले आहे. त्यांना खरी ओळख ‘ओ शेठ’ गाण्याने मिळाली आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलने शंभरी गाठल्यानंतर पंतप्रधान मोदींचा फोटो आणि हे गाणे मिक्स करून सोशल माध्यमावर अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. मीम्ससह इन्स्टाग्राम रिल्समुळे या गाण्याला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर जवळपास तीन लाख ६३ हजारांहून अधिक रिल्स या गाण्यावर तयार झाले आहेत. या रिल्सवरही व्हिडिओ क्रिएटरला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.

गाण्याच्या राइट्‌ससाठी नामांकित कंपन्यांकडून विचारणा

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय ग्रेट’ हे गाणे ऑडिओ स्वरूपात करण्यात आले आहे. गाणे व्हिडिओ स्वरूपात करण्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांकडून संध्या-प्रनिकेत जोडीला विचारणा करण्यात येत आहे. पण स्वतःच हे गाणे व्हिडिओ स्वरूपात आणणार असल्याचे संध्या केशे-प्रनिकेत खुने यांनी सांगितले.

‘ओ शेठ’ गाण्याचे शब्द सोशल माध्यमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कमेंटमधून घेतले आहेत. गाणे लिहिताना गाणे हिट कसे होईल, असाच विचार मनात असतो. ‘ओ शेठ’ गाणे दहा लाख लोक बघतील असा अंदाज आमचा होता; परंतु गाण्याने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. नाशिककरांकडून कौतुक व्हावे असे लहानपणी वाटायचे ते स्वप्न ‘ओ शेठ’ गाण्याने सत्यात उतरले आहे. चार वर्षांपासून प्रनिकेतसोबत काम करत असून, घरच्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे.

-संध्या केशे, गीत-संगीतकार

‘ओ शेठ’ गाण्याला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाल्याने भारावून गेलो आहे. ओ शेठ गाणे एक कोटीचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा नव्हती. या गाण्यातून काय वेगळे झाले याचा सतत विचार सुरू आहे. नाशिक-उस्मानाबादची संध्या-प्रनिकेतची जोडी रसिकांसाठी यापुढे यापेक्षा कसे चांगले देता येईल यासाठी काम करणार आहे. या गाण्यानंतर आमच्याकडून रसिक श्रोत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

-प्रनिकेत खुने, संगीतकार

(O Sheth song gave Nashik-based musician Sandhya Keshe a recognition)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT