SN120A00794_pr.jpg 
नाशिक

आई मदतनीस तर वडील चालवता गॅरेज...शिक्षणाच्या खर्चासाठी रोज संघर्ष करणाऱ्या साक्षीची यशोगाथा वाचाच

रोशन खैरनार

नाशिक / सटाणा : गुणवत्तेच्या जोरावर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा तिचा मानस आहे. मात्र जगण्याची लढाई आणि शिक्षणाचा खर्च, या दोन्ही लढाई एकाच वेळी लढण्याचे मोठे आव्हान साक्षीसमोर आहे. 

सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न 

आर्थिक स्थिती बिकट असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत येथील व्हीपीएन विद्यालयातील साक्षी हिरे हिने दहावीत ८८.६० टक्के मिळवले. तिच्या या यशामागची कहाणी अत्यंत संघर्षमय आहे. उच्च शिक्षण घेऊन मुलांप्रमाणे देशसेवेसाठी सैन्यदलात उच्च अधिकारी बनावे, अशी तिची इच्छा आहे. याचबरोबर कुटुंबाला अन् आपल्यासारख्या संघर्ष करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आधाराचा हात होण्याचे तिचे स्वप्न आहे. पण त्या अगोदर साक्षीसाठी समाजाला आधाराचा हात बनावे लागणार आहे. औंदाणे (ता. बागलाण) येथे वास्तव्यास असलेल्या साक्षीचे वडील बाजीराव हिरे यांचे शिक्षण जेमतेम असून, आई अंगणवाडी मदतनीस म्हणून औंदाणे येथेच काम करते. शिक्षण नाही आणि व्यवसायाला भांडवलही नाही, अशा बिकट परिस्थितीत त्यांनी सटाणा शहरात छोट्याशा टपरीत दुचाकी गॅरेज सुरू केले. 

घरीच केला अभ्यास 

साक्षीला एक लहान भाऊ आहे. वडिलांच्या अस्थैर्याला पूरक पर्याय शोधताना या लेकरांच्या आईने उन्हाळ्यामध्ये केलेल्या लोकांच्या पापड-कुरडई तयार करण्याच्या कामातही साक्षी व तिचा लहान भाऊ मदत करतात. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कधीही डगमगून न जाता साक्षीने जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्राथमिक आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. या कालावधीत तिने एकही खासगी शिकवणी न लावता घरीच आपला अभ्यास केला. 

आर्थिक तरतूद आवाक्याबाहेर 

औंदाणे येथून दररोज मिळेल त्या वाहनाने प्रवास करून ती शाळेत ये-जा अन् गणवेशालाही ठिगळ लावून साक्षीने तो वापरला. तिच्यातील शिकण्याची धडपड बघून मुख्याध्यापक अनिल जाधव, शिक्षिका पुष्पलता पाटील, योगिता सोनवणे, शांताराम खरे, योगेश पवार, संदीप वैष्णव, आर. एस. चंदन यांनी तिला वारंवार आर्थिक मदत आणि पाठबळ देऊन शिकण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे शिक्षणविषयी तिला बळ मिळाले. तिचा आवडता विषय विज्ञान; पण आर्थिक तरतूद आवाक्याबाहेर असल्याने तिने वाणिज्य शाखेत प्रवेशाचा निर्णय घेतला असून, महाविद्यालयात एनसीसीमध्ये सहभाग घेणार आहे. पुढे उच्च शिक्षण घेऊन देशसेवेसाठी सैन्यदलात उच्च अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. 

सुखाचे आयुष्य द्यायचेय 

‘कुटुंबाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या जाणिवेतून अभ्यासाची प्रेरणा मिळाली. मला स्वत:च्या पायांवर उभे राहायचे असून, माझ्या शिक्षणासाठी तळमळ करीत दारिद्र्याशी झगडणारे आई-वडील आणि लहान भावाला सुखाचे आयुष्य द्यायचे आहे,’ असं साक्षी सांगते.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

SCROLL FOR NEXT