fake-friends.jpg 
नाशिक

नाशिक : अनुसूचित जमाती समितीतील अधिकाऱ्याची उचलबांगडी

कुणाल संत

नाशिक : बोगस आदिवासी असल्याची तक्रार दाखल झाल्याने या तक्रारीची दखल घेत शासनाकडून ठाणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीमधील संशोधन सहाय्यक असलेल्या अधिकारी यांची समितीमधून उचलबांगडी केली आहे.

ठाणे (Thane) येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीमध्ये रत्नाकर कोळी हे संशोधक सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मात्र श्री. कोळी हे आदिवासींच्या नामसाधर्म्याचा फायदा घेऊन सुमारे तीस वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा दावाच ठाणे अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) समितीने अवैध ठरविला आहे. तसेच संबंधित कोळी यांचे प्रमाणपत्र जप्त व रद्दही केले आहे.

त्यामुळे या अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात यावा, शासन सेवेत कार्यरत असताना घेतलेल्या विविध सुविधा आणि वेतनाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव यांनी आदिवासी विकासमंत्री (Minister for Tribal Development) ॲड. के. सी. पाडवी (Adv. K.C. Padavi) यांच्याकडे भेट घेत निवेदनाद्वारे केली होती. रत्नाकर कोळी यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीची दखल शासनाने घेत त्यांची समितीमधून उचलबांगडी केली आहे. शासनाने त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करत त्यांची जव्हार प्रकल्प कार्यालयात पर्यायी व्यवस्था केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer : संघाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या आणखी एका सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई; वैद्यकीय अधिकाऱ्याला केलं निलंबित

Kolhapur Jaggery : दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त! कोल्हापुरात गुळाचे सौदे सुरू, एका क्विंटलला उच्चांकी दर

Laadki Bahin Yojana : भाऊबीजेला मिळणार लाडक्या बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं! सोहमची पूजाच्या फोटोंवर खास कमेंट, व्यक्त केलं मनातलं प्रेम

SCROLL FOR NEXT