Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Director General Rashmi Shukla, Police Commissioner Sandeep Karnik esakal
नाशिक

Police Sports Competition: पोलीस क्रीडा स्पर्धांचे आज औपचारिक उद्‌घाटन! CMची उपस्थिती; समारोपाला उपमुख्यमंत्री फडणवीस

या स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन गुरुवारी (ता. ८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना गेल्या रविवारपासून (ता. ४) प्रारंभ झाला असला तरी, या स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन गुरुवारी (ता. ८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. (Official opening of police sports competition today Presence of CM Deputy Chief Minister Fadnavis concluded nashik news)

३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील १९ मैदानावर सुरू आहेत. या स्पर्धेचे यजमानपद नाशिक शहर पोलीस आयुक्तालय भूषवित असून, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांना गेल्या रविवारी (ता.४) प्रारंभ झाला आहे. मात्र, यास्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन गुरुवारी (ता.८) दुपारी चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे, या स्पर्धांचा समारोप येत्या शनिवारी (ता. १०) सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेते संघ व खेळाडूंना पदक प्रदान केले जाणार आहे.

या स्पर्धांसाठी राज्यभरातून साडेतीन हजार पोलीस खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्याचप्रमाणे, राज्यातील अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहे.

खेळाडूंची सर्वोत्तम निगा

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांसाठी नाशिकमध्ये आलेल्या राज्यभरातील पोलीस खेळाडू व अधिकार्यांसाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सर्वोत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

पुरुष खेळाडूंसाठी पंचवटीतील म्हाडाची इमारतीत तर महिला खेळाडूंची महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये निवासाची सोय केली आहे. थंडीचे दिवस असल्याने गरम पाण्याने आंघोळीचीही सोय केली आहे.

तसेच, भोजनाचीही उत्तम सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

खेळाडूंसाठी देण्यात आलेल्य सोयीसुविधांची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: पाहणी करून खेळाडूंना कोणतीही अडचण येणार याची काळजी घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT