fire esakal
नाशिक

Nashik News : खेडलेझुंगे येथे आगीत 7 जनावरे होरपळली; शेतकऱ्याचे मोठे नुकसान!

सकाळ वृत्तसेवा

निफाड (जि. नाशिक) : अस्मानी अन्‌ सुलतानी संकटामधून वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांमागील संकटांची मालिका संपता संपेना.

उन्हाळ्यामध्ये जनवारांना (Animal) चारा मिळावा म्हणून सोयाबीन, मका चऱ्याची कुटी (भुसा) साठवून ठेवलेला होता. (On fire at Khedlezunge 7 animals died nashik news)

त्याला मध्यरात्री आग लागल्याने सर्व नष्ट होऊन चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खेडलेझुंगे (ता. निफाड) येथे भर वस्तीत असलेल्या कैलास माधव घोटेकर यांच्या मालकीच्या गट नंबर ४५२-अ मध्ये राहते घर आणि जनवारांचा गोठा आहे. त्यांनी पशुधनासाठी साठवून ठेवलेल्या भुशाच्या छपराला व गायीच्या गोठ्याला मध्यरात्रीनंतर २ ते ३ वाजेच्या सुमारास आग लागून अंदाजे २ ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेत राहत्या घरासमोरील गोठ्यात १ गाय, ५ म्हशी आणि १ पारडी आगीच्या वाफेने भाजल्या आहेत. घरासमोरच जनावरांचा गोठा होता. मध्यरात्रीची वेळ असल्याने कुटुंबियांना आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. आगीच्या वाफेमुळे जनावरांनी मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा सुरु केला होता.

या आवाजाने घोटेकर व परिसरातील कुटुंबीय जागे होऊन गोठ्याकडे धावले असता, गोठ्यातून आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे विदारक चित्र बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ओरडणारे पशुधन डोळ्यासमोर बघून सर्वांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. भुसाऱ्याची आग असल्याने आग विझविण्यासाठी मोठा कालावधी गेला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

दरम्यान, माहिती मिळताच देवगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. जी. शीसोदे व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले. भाजलेल्या जनावरांची तपासणी करून ते ३० ते ४० टक्के भाजल्याचे डॉ. शिसोदे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी वेदनाशामक प्रतिजैविके, व्हिटॅमिन्सचे इंजेक्शन आणि सलाईन देऊन, जखमेवर शाई व मलम लावून उपचार केले.

शासन स्तरावरून पंचनामा होऊन मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी ज्ञानेश्‍वर गिते, प्रमोद गिते, साईल घोटेकर, कैलास साबळे, सावळीराम गिते, विलास घोटेकर, ऋषिकेश घोटेकर, कृष्णा घोटेकर, अनिमेश साबळे, सार्थक साबळे, गणेश गिते यांनी अथक परिश्रम घेतले.

"शेतीमालाला भाव नाही म्हणून मी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी म्हशी व गाय घेतली होती. परंतु, मध्यरात्री अचानक लागलेल्या या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आगीमध्ये ६ मोठी आणि १ लहान, अशी ७ जनावरे भाजली आहेत. तसेच, गोठ्याचे पत्रे, पाईप, अँगलचेही नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत मिळणे गरजेचे आहे."-कैलास माधव घोटेकर, शेतकरी.

"पशुधन मोठ्या प्रमाणावर आगीच्या वाफेमुळे भाजली आहेत. ती पूर्ण बरी होण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. जखमा खोलवर नसल्याने पशुधन दगवण्याची शक्यता खूपच कमी आहे." -डॉ. एम. जी. शिसोदे, पशुधन विकास अधिकारी, देवगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar : नानाची वाडी झाली सुन्न! सिंहगडाच्या मातीत रमलेला, आणि येथेच विसावला; ग्रामस्थांची भावना

IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Latest Marathi News Live Update: अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचले

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

SCROLL FOR NEXT