damage drainage esakal
नाशिक

Nashik News : तुटलेला ढापा कधीही बनू शकतो जीवघेणा

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : पेलीकन पार्क मागील सोनवणेनगर येथे रस्त्यावरील ड्रेनेज गेल्या अनेक महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत असून, येथील रहदारी लक्षात घेता कधीही अपघात घडण्याची शक्यता आहे. (on road broken drainage can become life threatening Traffic nashik news)

याबाबत स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी सिडको विभागीय कार्यालयात तक्रार केली असतानादेखील या गंभीर बाबीकडे सर्रास काणाडोळा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

ड्रेनेजवरील झाकण कधीही तुटून आत पडू शकते. एखादा भीषण प्रसंग घडल्यानंतरच मनपा प्रशासनास जाग येईल का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

"पेलीकन पार्कच्या मागील बाजूस अनेक महिन्यांपासून भररस्त्यातील ड्रेनेजवरील ढाप्याचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. रात्री ही बाब वाहनचालकाच्या लक्षात न आल्यास भीषण अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. सिडको विभागीय कार्यालय या गंभीर बाबीकडे काणाडोळा करत आहे." - अनिल वाघ, रहिवासी

"रस्त्यावरील ढापा तुटलेल्या अवस्थेत असून मनपा सिडको विभागीय कार्यालयात याबाबत सूचित करूनदेखील काही उपाययोजना केलेल्या नाही. नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे." - कल्पना गोरे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT