Jal Jeevan Mission News esakal
नाशिक

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामांची ऑन द स्पॉट पडताळणी सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अतंर्गत सुरू असलेल्या कामांच्या वाढत्या तक्रारींवरून कामांची पडताळणी करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला. (On spot verification of Jal Jeevan mission work started nashik news)

यानुसार तक्रारी असलेल्या दहा तालुक्यांतील कामांच्या पडताळणीला शनिवारी (ता. २०) प्रारंभ झाला. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे यांच्या पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची पाहणी करत पडताळणी केली.

जिल्ह्यात जलजीवन मिशन अतंर्गत एक हजार २२२ हून अधिक कामे मंजूर असून, ही कामे सुरू आहेत. मात्र, कामांबाबत ग्रामपातळीवरून मोठ्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिशा समितीच्या बैठकीत सुरू असलेल्या कामांचे वाभाडे काढले होते.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीतही जलजीवनच्या कामांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी मांडल्या, तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी थेट जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता यांच्या दालानत ठिय्या मांडत या योजनेतील सुरू असलेल्या कामांचा पंचनामा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. या कामांची विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मंजूर झालेल्या कामांप्रमाणे काम सुरू आहे की नाही, याची पडताळणी करावी. पाण्याचे स्त्रोत, पाण्याचे पाइप, पाण्याची टाकी याबाबतही पडताळणी करावी, अशा सूचना मित्तल यांनी दिल्या.

या आदेशाप्रमाणे पडताळणी करण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगमनेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारपासून ‘ऑन द स्पॉट’ जात कामांची पडताळणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात तक्रारीप्राप्त झालेल्या दहा तालुक्यांतील कामांची पाहणी करून पडताळणी केली जाणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आमदार खोसकर यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशनची आढावा बैठक झाली.

यात रायते येथील कामांबाबत तक्रारी असल्याने त्यांची चौकशी करण्याचा निर्णय झाला. पेगलवाडी पाणीयोजनेचे स्त्रोत कोरडे असल्याचे बैठकीत निष्पन्न झाले. बोरीची वाडी, देवगाव येथील पाणीपुरवठा योजनेत पाण्याची टाकी खाली बांधण्यात आली असून, पाण्याचे स्त्रोत वर आहे, यात पाणी वर येत नसल्याचे उघड झाले.

मेटघर किल्ला येथील काम संथगतीने सुरू असल्याने त्याबाबत विचारणा करण्यात आली. कोटंबी येथील कामे अद्यापही सुरू नसल्याचे समोर आले. त्यावर सुरू न झालेल्या ठेकेदार, सरपंच यांची एकत्र बैठक घेण्याचे निश्चित झाले.

त्रुटी काढणाऱ्या अधिकाऱ्यास तपासणीची शिक्षा

जलजीवन मिशनच्या कामांच्या फायलींमध्ये अनेक चुका असल्याचे तसेच चुकीच्या पद्धतीने योजना राबवीत असल्याचे प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी वेळोवेळी उघड करत फायलींना त्रुटी लावल्या. त्या वेळी मोठी ओरड झाली.

मात्र, आता पालकमंत्र्यांसह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी योजनांबाबत तक्रारी करत आहेत. त्या वेळी जाग आलेल्या प्रशासनाने पडताळणीचे काम हाती घेतले. यातही विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनवणे यांना सोडून प्रकल्प संचालक संगमनेरे यांनाच पडताळणीची जबाबदारी देत शिक्षा दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT