gujrat border.jpg 
नाशिक

पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता धक्कादायक प्रकार; पोलिसांनी छापा टाकत पकडले रंगेहाथ

विनोद बेदरकर

नाशिक : महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील बर्डीपाडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून दादरा, नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला तब्बल दीड कोटी रुपयांचा बेकायदा मद्यसाठा हस्तगत केला. या कारवाईत तीन जणांना अटक केली असून, मद्यवाहतुकीसाठी वापरलेली चार वाहने जप्त केली.

असा आहे प्रकार
 
गिरीश पवार (वय २३, उंबरठाण, सुरगाणा), हेमंत मोरे (वय २२, बापळून, सुरगाणा) आणि शैलेश गावित (वय ३०, सातवाकल, धरमपूर, गुजरात) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागात नोंदविलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर सुरगाणा तालुक्यात बर्डीपाडा-परगाणा रस्त्यावरील पत्र्याच्या गुदामात छापे टाकले. या गुदामांत बेकायदा वाहतूक करून मद्याची साठवणूक करण्यात आल्याचे पुढे आले असून, या कारवाईत तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या.

दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

पथकाने वाहतुकीसाठी वापरलेले दोन आयशर टेम्पो, दोन चारचाकी वाहने आणि अवैध मद्यासाठा असा सुमारे एक कोटी ४५ लाख ९३ हजार ९५३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड, एस. व्ही. बोधे, जवान तांबळे, शेख, नेमाडे, कदम, झिंगळे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणी संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT