card hackers.jpg
card hackers.jpg 
नाशिक

तुमचे डेबिट, क्रेडिट कार्ड नक्की सुरक्षित आहेत ना?...कारण...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : भारतातील डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती डार्कवेबवर पुन्हा विक्रीस उपलब्ध झाली आहे. यंदा जवळपास चार लाख 61 हजार 976 कार्डांचा डेटा हॅकर्सना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी प्रतिकार्ड सुमारे नऊ डॉलरची बोली लावली जात असल्याचा धक्‍कादायक खुलासा नुकताच झालेला आहे. 

या कार्डांचे मूल्य 4.2 मिलियन डॉलर इतके 

गेल्या ऑक्‍टोबरमध्ये 13 लाख डेबिट, क्रेडिट कार्डचा डेटा जोकर्स स्टॅशवर उपलब्ध झाला होता. सायबर सुरक्षेपासून लपत हॅकर्सकडून या मौल्यवान डेटाची खरेदी डार्कवेबवर सुरू होती. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा भारतीयांच्या कार्डाचा डेटा डार्कवेबवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. यंदा सुमारे चार लाख 61 हजार 976 कार्डांची गोपनीय माहिती विक्री केली जात आहे. यात कार्डाचा क्रमांक, सीव्हीव्ही, व्हॅलिडिटीच्या माहितीसह ग्राहकाचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक अशा बऱ्याच संवेदनशील माहितीचा समावेश आहे. विशेष म्हणजे दिग्गज बॅंकांच्या ग्राहकांच्या माहितीचा यात समावेश आहे. मअसल्याचे बोलले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सतर्क राहण्याची आवश्‍यकता जाणकारांकडून व्यक्‍त केली जात आहे. 

सावधगिरी बाळगणे आवश्‍यक 

डेटा गळतीच्या घटना लक्षात घेता, ग्राहकांनी आपल्या कार्डबद्दलची माहिती गोपनीय ठेवणे आवश्‍यक आहे, तसेच नियमितपणे पासवर्डसह पिन क्रमांक बदलणे, सुरक्षे बाबतच्या सर्व तरतुदी करणे आवश्‍यक आहे. कार्डशी निगडित संशयास्पद व्यवहारा संबंधी माहिती कमीत कमी वेळेत संबंधित बॅंकेला कळविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT