car accident.jpg 
नाशिक

नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

मोठाभाऊ पगार

देवळा (नाशिक) : मित्राकडून भावाच्या लग्नाचे आमंत्रण आले होते. मित्राचा भाऊ कसा तोदेखील मित्रच झाला होता. जवळचा मित्र असल्याने अक्षय हळदीच्या कार्यक्रमाला निघाला. सुखाचा प्रवास सुरु असतांनाच नियतीने अडविला रस्ता अन् काही वेळात आनंदावर विरजण. असे काही घडले की कुटुंबियांसह मित्रालाही अश्रू अनावर. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

देवळा-नाशिक रस्त्याच्या भावडबारी घाटाच्या पायथ्याशी भावडे फाट्याजवळील घटना. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, बुधवार (ता.6) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अक्षय गणपत दिवे (वय 26, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) हा तरुण नाशिकवरुन सटाणा येथे मित्राच्या भावाच्या हळदीच्या कार्यक्रमाला जात होता. तो स्वतःच ड्रायव्हिंग करत होता. भावडबारी घाटाच्या पायथ्याशी सदर स्कोडा चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. यात अक्षय हा तरुण कारखाली दबला गेल्याने तो जागीच ठार झाला. देवळा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

मोटार अपघाताचा गुन्हा दाखल

देवळा पोलिसांत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तापास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, खंडेराव भवर, विनायक गायकवाड, लहानू धोकरट करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT