Haj Yatra 2024 esakal
नाशिक

Haj Yatra 2024 : देशभरातून हज यात्रेसाठी एक लाख 60 हजार अर्ज; नाशिक जिल्ह्यातील 1 हजार 650 भाविकांचा समावेश

यंदाच्या हज यात्रेनिमित्ताने देशासाठी १ लाख ७५ हजारांचा कोटा देण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सोमवार (ता.१५) शेवटची मुदत होती. मुदत अखेर देशातून १ लाख ६० हजार तर राज्यभरातून २४ हजार ९३५ अर्ज भाविकांनी दाखल केले आहे.

शहरातील ३५० भाविकांचा यात समावेश आहे. (One lakh 60 thousand applications for Hajj from all over country Including 1 thousand 650 devotees from Nashik district)

दरवर्षी मुस्लिम बांधवांसाठी हज कमिटीतर्फे यात्रेचे आयोजन केले जाते. देशभरातून लाखाच्या संख्येने भाविक यात्रेस जात असतात. यंदाच्या हज यात्रेनिमित्ताने देशासाठी १ लाख ७५ हजारांचा कोटा देण्यात आला आहे.

अर्ज करण्यासाठी हज कमिटीतर्फे प्रथम बुधवार २० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. भाविकांच्या मागणीनुसार अर्ज करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली होती. सुमारे २५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली होती.

सोमवार (ता.१५) भाविकांना अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. मुदत अखेर देशभरातून १ लाख ६० हजार तर राज्यातून २४ हजार ९३५ अर्ज अर्ज दाखल झाले आहेत. शहरातून ३५० तर मालेगाव येथून १ हजार ३०० असे जिल्ह्यातून १ हजार ६५० भाविकांचा यात समावेश आहे.

त्यात राज्यातील मेहरम नसलेले १०६ महिला भाविक यांच्यासह ७० वर्षापेक्षा अधिक वय असलेले १ हजार १०६ भाविकांसह अन्य २३ हजार ५५४ भाविकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती कमिटीच्या सदस्यांकडून देण्यात आली.

येत्या काही दिवसात छाननी होऊन जानेवारी अखेरीस अथवा फेब्रुवारीच्या सुरवातीस लकी ड्रॉ होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

"मुंबई विमानतळावरून हज यात्रेस जाण्यास कमी खर्च लागतो. त्यामुळे मुंबई येथून २२ हजार ६२८, नागपुरमधून १ हजार १३१, औरंगाबाद येथून १०६ भाविकांनी तर नांदेड, बीड, उस्मानाबाद भागातून ८६९ भाविकांनी हैदराबाद येथून अर्ज केले आहे." - हाजीहमीद खान, खादिमुल हुज्जाज हज कमिटी ग्रुपचे सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT