corona  sakal
नाशिक

नाशिक शहर-जिल्ह्यातील १ टक्का मुले २७ दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह

शून्य ते पाच आणि ६ ते १० वर्षांमध्ये प्रमाण प्रत्येकी १.३ टक्का

सकाळ वृत्तसेवा

शून्य ते पाच आणि ६ ते १० वर्षांमध्ये प्रमाण प्रत्येकी १.३ टक्का

नाशिक : नाशिक शहर(nashik), मालेगाव शहर(malgeoan), ग्रामीण भागामध्ये(rural area) गेल्या २७ दिवसांमध्ये १५ हजार ६५५ मुलांची आरटीपीसीआर (rtpcr test)अन रॅट चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १५४ मुले कोरोना पॉझिटिव्ह(corona positive) आढळली असून पॉझिटिव्हीचा दर एक टक्का राहिला आहे. शून्य ते पाच वर्षे आणि सहा ते दहा वर्षे वयोगटामध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण प्रत्येकी १.३ टक्के राहिले आहे.अकरा ते पंधरा वर्षे वयोगटात १.२, सोळा ते अठरा वर्षे वयोगटात ०.७ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आरोग्य यंत्रणेला आढळून आले आहे.

कोरोनाची लागण झाल्याची स्थिती पाहता, विशेषतः शाळेत न जाणाऱ्या आणि पहिली ते नववीपर्यंतच्या मुलांची काळजी घेण्याचे आव्हान कुटुंबांपुढे उभे ठाकले आहे. मुलांकडून मास्क वापरला जाईल, हात स्वच्छ धुतला जाईल आणि अंतर राखले जाईल याची काळजी घेण्यापासून ते एखादे मूल आजारी आढळल्यास त्याच्यावर तातडीने वैद्यकीय इलाज करण्यावर भर द्यावा लागणार आहे. आरोग्य विभागातर्फे मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळेत येताना प्रत्येक मुलाचे तापमान मोजणे, ऑक्सीमीटरने तपासणी करणे इथंपासून ते मुले गर्दीने एकत्र अधिक काळ थांबणार नाहीत इथपर्यंतच्या सूचनांचा त्यात समावेश आहे. याशिवाय सर्दी, खोकला, ताप आढळल्यास अशा मुलांकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

मुलांमध्ये लागण अधिक

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक म्हणजे १.२० टक्के इतके आहे. ०.७४ टक्के मुली पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. वयोगटनिहाय आरटीपीसीआर आणि रॅट चाचणी करण्यात आलेल्या मुलांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या मुलांची संख्या दर्शवते) : मुली : शून्य ते पाच वर्षे-५०५ (४), सहा ते दहा वर्षे-१ हजार ४८ (१४), अकरा ते पंधरा वर्षे-३ हजार १३ (२४), सोळा ते अठरा वर्षे-२ हजार ८४३ (१४). एकूण-७ हजार ४०९ (५५). मुले : शून्य ते पाच वर्षे-६२० (१०), सहा ते दहा वर्षे-१ हजार ६८ (१४), अकरा ते पंधरा वर्षे-२ हजार ८२१ (४५), सोळा ते अठरा वर्षे-३ हजार ७३६ (३०). एकूण-८ हजार २४५ (९९).

वयोगटनिहाय कोरोना रुग्ण

  1. शून्य ते पाच वर्षे १४

  2. सहा ते दहा वर्षे २८

  3. अकरा ते पंधरा वर्षे ६९

  4. सोळा ते अठरा वर्षे ४४

  5. १९ आणि अधिक वर्षे १ हजार ६६

  6. (तरुणी-४८४ आणि तरुण-५८२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT