One thousand 19 beds have been added in 36 new hospitals in Nashik city Corona Update 
नाशिक

Corona Updates : नाशिक शहरात ३६ रुग्णालयांमध्ये एक हजार बेड; अद्यापही ९२१ ऑक्सिजन बेड शिल्लक

विक्रांत मते

नाशिक : गेल्या काही दिवसांत शहरात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे बोलले जात असले, तरी नागरिकांना फक्त ठराविक हॉस्पिटलचाच आग्रह असून, शहरात अद्यापही ९२१ ऑक्सिजन बेड शिल्लक असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. मागील चार दिवसांत ३६ रुग्णालयांमध्ये एक हजार १९ बेड नव्याने वाढविण्यात आल्याने शहरातील ११९ रुग्णालयांमध्ये आता चार हजार ५६५ बेड उपलब्ध झाल्याची माहिती दिली. 

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, रुग्णालयांमध्ये बेड फुल होत असल्याचे वास्तव आहे. मात्र, महापालिकेने शहरात ११९ रुग्णालये कोविड म्हणून घोषित करताना, ऑक्सिजन बेडची पुरेशी व्यवस्था केल्याचा दावा आयुक्त कैलास जाधव यांनी केला. महापालिकेने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दीडशे, तर नवीन बिटको रुग्णालयात ५०० बेड उपलब्ध करून दिले आहेत. समाजकल्याण कोविड सेंटर सुरू केले. ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढल्यानंतर ८३ खासगी रुग्णालयांत तीन हजार ५४६ बेड उपलब्ध करून दिले आहेत. त्यानंतरही बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने मागील चार दिवसांत खासगी रुग्णालयांची संख्या ११९ पर्यंत पोचविली. नवीन ३६ रुग्णालयांमध्ये एक हजार १९ बेड वाढविण्यात आल्याने खासगी रुग्णालयांतील बेडची संख्या चार हजार ५६५ पर्यंत पोचली आहे. 

 
ठराविक रुग्णालयांचा आग्रह 

रुग्णांना शहरात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र, वास्तवात ९२१ ऑक्सिजन बेड रिक्त असल्याचे महापालिकेच्या डॅशबोर्डवर दिसत आहे. एक हजारावर सर्वसाधारण बेड शिल्लक आहेत. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयांची माहिती नाही व ठराविक रुग्णालयांमध्येच रुग्ण दाखल करण्याचा आग्रह असल्याने समस्या निर्माण होत असल्याचा दावा आयुक्त जाधव यांनी केला आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर सर्वच कोविड रुग्णालयांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी घरापर्यंत पत्रके वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी माहिती दिली.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT