While interacting with farmers and traders on Friday, Sinnar Bazaar Committee Chairman Dr. Ravindra Pawar. Neighbor officials. esakal
नाशिक

Nashik: 2 सत्रात कांद्याचे लिलाव, टोमॅटोसाठी खळे वाढवणार! नायगाव, पांढुर्लीत शेतकऱ्यांच्या अडचणींविषयी मंथन

सकाळ वृत्तसेवा

https://www.youtube.com/watch?v=nXMdL03BaOYNashik : नायगाव येथील उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव दोन सत्रात सुरू करण्याबरोबरच पांढुर्ली येथे टोमॅटो मार्केटसाठी खळ्यांची संख्या वाढवली जाईल.

तसेच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी परवानाधारक व्यापाऱ्यांनाच लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल असे आश्वासन सिन्नर बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती डॉ. रवींद्र पवार यांनी दिली. (Onion auction in 2 sessions will increase threshing floor for tomatoes Brainstorming about farmers problems in Naigaon Pandhurli Nashik)

बाजार समिती संचालकांसोबत श्री. पवार यांनी नायगाव व पांढुर्ली येथील उपबाजार आवारात शेतकऱ्यांशी संवाद साधला. सिन्नर बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने प्रत्यक्ष भेट देऊन नायगाव आणि पांढुर्ली येथे उपबाजार आवारात शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार व इतर संबंधित घटकांच्या अडचणी समजून घेतल्या.

नायगाव उपबाजार आवारात शेतकऱ्यांनी कांदा लिलावाच्या वेळेबाबत तक्रारी केल्या व लिलाव वेळेवर सकाळी दहाला सुरु करावेत अशी मागणी केली. त्यावर सभापती श्री. पवार यांनी व्यापाऱ्यांनी लिलावाच्या वेळेबाबत सुधारणा करावी अशा सूचना केल्या.

व्यापारी बबला ठक्कर, संतोष भराडीया, एकनाथ सानप, योगेश चकोर, राजेंद्र मंडलीक, विलास काकड, दिलीप बोडके, कलीम शेख, प्रशांत सानप, शांतु ठक्कर, शेतकरी संदीप पानसरे, भाऊसाहेब कापसे, सौरभ जेजुरकर, संतोष जेजुरकर, नवनाथ चव्हाण, सोमनाथ आव्हाड, अशोक नागरे, सुनील गिलबिले आदी उपस्थित होते.

दोन्ही उपबाजार आवारात स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने सभापती श्री. पवार व उपसभापती सिंधू कोकाटे, संचालक नवनाथ घुगे, सुनील चकोर, रवींद्र शेळके, शरद थोरात, अनिल शेळके आदींचा सत्कार करण्यात आला.

सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, आर. जे. डगळे, एस. डी. चव्हाण, ए. बी. भांगरे यांनी व्यापारी प्लॉट/खळे व खरेदी प्रक्रियेबाबत माहिती दिली.

व्यापारी निवृत्ती चव्हाणके, प्रवीण चव्हाणके, दत्तुशेठ हारक, नितीन आरोटे, बापू डांगे, दिलावर बागवान, अजहर शेख, अभिजित सोनवणे, दिलीप सोनवणे, सुजय सोनवणे शेतकरी सुकदेव वाजे, कैलास वाजे, विकास वाजे, चंद्रकांत वाजे, विकास पवार, हिरामण मंडलिक, युवराज वाजे, कचरू चव्हाणके, अरुण हारक, अण्णा हारक, तेजस वाघ, भाऊराव जाधव यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पायाभूत सुविधा निर्माण करणार

कांदा अनुदान तपासणीचे काम प्रगतिपथावर असून त्याबाबत तांत्रिक अडचण आल्यास शासन पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, बाजार समिती आवारात शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पांढुर्ली येथे कांदा व टोमॅटो व्यापाऱ्यांशी चर्चा करून तेथील शेतकरी व व्यापारी यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

फसवणूक टाळण्याची उपाय

शेतकऱ्यांनी या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बाजार समिती आवारात काँक्रिटीकरण/डांबरीकरण करण्यात यावे, टोमॅटो मार्केट दुपारी एकला सुरु करावे, अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांचे फलक दर्शनी भागास लावावेत.

पांढुर्ली (सावतामाळीनगर) येथे असलेली जागा लिलावासाठी व खळ्यांसाठी अपुरी पडत असल्याने नव्याने जागा घेऊन त्या ठिकाणी लिलाव करावेत. व शेतमाल खाली करण्यासाठी अस्तित्वातील खळ्यांचा वापर करावा अशा सूचना मांडल्या.

सभापती श्री. पवार यांनी संचालक मंडळाकडून नेहमीच शेतकऱ्यांचे हित प्राधान्याने बघितले जाणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या योग्य असून आगामी काळात त्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल.

तसेच, शेतकरी बांधवांची मालाच्या विक्रीमागे होणारी फसवणूक टाळण्यासाठी बाजार समितीकडून कठोर पावले उचलली जातील असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT