Onion News esakal
नाशिक

Nashik Onion News : कांदा व्यापाऱ्यांकडून संप बिनशर्त मागे; पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने 13 दिवसांनंतर तोडगा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या तेरा दिवसांपासून पुकारलेला संप आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीअंती बनिशर्त मागे घेतला.

पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता.२) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून अखेर तोडगा काढल्याने तब्बल तेरा दिवसांनंतर मंगळवार (ता.३) पासून कांदा लिलाव पूर्ववत होतील. (onion auction started from today nashik news)

कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क मागे घेण्यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून लिलाव बंद ठेवले होते. याविषयावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुंबईत बैठक घेतली. त्याच दिवशी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनीही व्यापाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.

पण व्यापाऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी बंद कायम ठेवला. अखेर विंचूर उपबाजार समितीपाठोपाठ निफाड बाजार समितीने लिलाव सुरु केले. त्यामुळे व्यापाऱ्यांवर दबाव वाढत असल्याने त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी चर्चा केली.

या चर्चेअंती तोडगा निघाल्याने व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमितपणे सुरु होतील.

स्वतःच्या फायद्यासाठीच...

कांदा व्यापाऱ्यांनी एकिकडे संप करण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे आपल्या गोदामामधील काद्यांची निर्यात सुरुच ठेवली. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेला भाव पदरात पडला. आता संपूर्ण गोदामे रिकामे झाल्यानंतर पुन्हा लिलाव सुरु करुन व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे व्यापाऱ्यांचा बंद हा शेतकऱ्यांसाठी नव्हे तर स्वत:च्या फायद्यासाठीच होता, अशी प्रतिक्रिया आता शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT