onion news esakal
नाशिक

केंद्राच्या बफर स्टॉकमुळे कांदा दरावर संक्रांत; लासलगावी लिलाव

अरूण खंगाळ,लासलगाव

लासलगाव (जि.नाशिक) : दिवाळीच्या नऊ दिवसाच्या सुट्टीनंतर मंगळवारपासून (ता.९) येथील बाजार समितीत कांदा लिलावाला सुरवात झाली. २८ ऑक्टोबरच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या दरात कमाल १५० रुपयांनी घट तर सरासरी भावात ३५० रुपयांची वाढ होऊन उन्हाळ कांद्याला किमान ७००, सरासरी २९०१ रूपये तर कमाल ३२५१ रुपये भाव मिळाला. दरम्यान केंद्राने नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला बफर स्टॉक विक्रीस काढल्यामुळे तो कांदा बाजारात येणार असल्याने त्याचा परिणाम कांदा दरावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता

केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी कांद्याचा बफर स्टॉक विक्रीस काढला असून कांद्याच्या दरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आधीच संकटात असणाऱ्या बळीराजावर केंद्राच्या या निर्णयामुळे आणखी संकट कोसळणार आहे. केंद्राने नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यातील १.११ लाख मे. टन कांदा विक्रीस काढला आहे. त्यामुळे कांद्याचे दर किमान सहा ते सात रूपये किलोवर येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

लासलगावी लिलाव सुरू, किमान २९०० रूपये दर, ३५० रुपयांनी वाढ

दिवाळीच्या सुटीनंतर आजपासून बाजार समिती सुरू झाली. उन्हाळ कांद्याची १३ हजार ९५३ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ७००, कमाल ३१०० रूपये तर सरासरी २५५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. लाल कांद्याची अंदाजे ४० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान २९६०, कमाल ३१०२ तर सरासरी २९६० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाले.

व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक नंदकुमार डागा यांच्या हस्ते भगरीबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन तर गोटूशेठ राका यांच्याहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले, यानंतर कांदा लिलावाला सुरुवात झाली. बाजार समितीचे सर्व लिलाव प्रमुख सुनील डचके, कांदा लिलाव प्रमुख दत्तू होळकर, व्यापारी मनोज जैन, प्रवीण कदम, दत्तू खाडे, अफजल शेख, संतोष माठा, ओम चोथानी व शेतकरी उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT