Yogesh Patil burying damaged onion in chali in a pit with the help of tractor beam. esakal
नाशिक

Onion Crisis : खड्डा खोदून शेतात पुरला कांदा; पाणावलेल्या डोळ्यादेखत दिली मूठमाती

सकाळ वृत्तसेवा

Onion Crisis : अवकाळी पावसात फटका बसलेला चाळीतील ३५ ट्रॉली कांदा खराब झाल्याने दह्याणे (पाळे) (ता. कळवण) येथील शेतकरी योगेश पाटील यांच्यावर शेतातच जेसीबीच्या साहाय्याने २० फूट खोल खड्डा खोदून त्यात खराब कांदा पुरण्याची नामुष्की ओढवली.

दिवसरात्र मेहनत घेऊन, खर्च करून साठविलेल्या कांद्यावर जड अंतःकरणाने माती ओतावी लागली. (Onion buried in field by digging pit nashik news)

कसमादे हा पट्टा जिल्ह्यात कांदा उत्पादनासाठी अग्रेसर मानला जातो. मात्र चालू हंगामात कांदा उत्पादकांना पहिल्यांदा भयानक परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली.कांद्याचे बी टाकण्यापासूनच वातावरणाने वेळोवेळी रंग बदलत संकटांची मालिका कांदे शेतातून काढण्यापर्यंत चालूच ठेवली.

यात अवकाळी पाऊस, गारपीट, विविध रोगांचा प्रादुर्भाव अशा सर्व संकटातही शेतकऱ्यांनी हिम्मत न सोडता काबाडकष्ट करून कांद्याचे पीक घेऊन चाळीत साठविला. मात्र वातावरणाच्या फटक्याने संपूर्ण कांदा खराब झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अजूनही २५ ते ३० ट्रॉली कांदा जमिनीत पुरावा लागणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. परिसरातील बहुतांश साठविलेल्या कांद्याची हीच परिस्थिती आहे. शिवाय जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे. त्याला बाजारात कवडीमोल भाव असल्याने, माल विक्रीचे वाहतूक भाडेही सुटत नसल्याने, शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

फक्त कांद्याच्याच बाबतीत ही शोकांतिका नाही तर टोमॅटो, मिरची यांना देखील बाजारभाव नसल्याने हा संपूर्ण हंगामच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार ठरला आहे.

"दिवसरात्र प्रचंड कष्ट, खर्च करून, चाळीत साठविलेला कांदा, शेतात खड्डा करून पुरताना मनाला प्रचंड वेदना झाल्या. मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. शासनाने शेतकऱ्यांचा कैवार घेऊन, नुकसान भरपाई दिली पाहिजे. तसेच शेतमालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्याला जगविले पाहिजे." -योगेश पाटील, कांदा उत्पादक, दह्याणे (पाळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये निवडणुकीआधी 'I.N.D.I.A' आघाडीला मोठा झटका!, आता ‘या’ मित्रपक्षाचाही स्वबळाचा नारा

Crime: पतीचा अश्लील व्हिडिओ बनवला; नंतर पत्नीनं धमकावलं अन्...; जे घडलं त्यानं सर्वच हादरले, प्रकरण काय?

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर आता अनलिमिटेड मेसेज पाठवता येणार नाहीत; कंपनी आणतेय 'मंथली लिमिट'

AFG vs PAK: पाकड्यांचे शेपूट वाकडे! अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना मारल्यानंतरही मालिका खेळणवण्यार ठाम; म्हणतात...

Vashi Farmers Protest : पवनचक्कीच्या अधिका-यांना काम करण्यास मज्जाव करुन रोखुण धरणा-या ७० शेतक-यावर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT