onion google
नाशिक

पावसाअभावी दुबार कांदा रोपेही लागवडीविना सुकली!

सकाळ डिजिटल टीम

खमताणे (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यात तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिली आहे. पेरलेली पिके सुकू लागली आहेत. रोपांचे आयुर्मान संपून गेले तरी कांदा लागवड होऊ शकलेली नाही. त्यानंतरही दुसऱ्‍या टप्प्यात पेरलेली रोपेही खराब होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


तालुक्यात अल्प पर्जन्यमान असलेल्या आणि विशेषत्वाने हलक्या जमिनीच्या भागात पावसाळी कांध्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यावर्षी शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून रोपे टाकली. परंतु, रोपे लावण्याची कालमर्यादा संपूनही पावसाने पुनरागमन झाले नाही. पाण्याअभावी कांदा लागवड अशक्य ठरल्याने हजारो रूपयांच्या रोपांची डोळ्यादेखत माती झाली. तालुक्यात जवळपास दीड महिन्यापासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पेरलेली मका, बाजरी व अन्य पिकेही सुकू लागली आहेत. समाधानकारक पर्जन्यमान वृष्टी न झाल्याने अद्याप नदी - नाल्यांना पाणी आले नाही. विहिरीचीही भूजळ पातळी वाढलेली नाही. पावसाळी कांद्याला पाऊस लांबल्यास प्रसंगी विहिरीतील पाण्याचा आधार असतो. सध्या मात्र शेतकरीवर्गाची दोन्ही आघाड्यांवर निराशा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात टाकलेली रोपेदेखील लागवडीयोग्य झाली आहेत. परंतु, पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे कधी नव्हे बागलाण तालुक्यातील खरिपातील पावसाळी कांद्याची लागवड यावर्षी रोडावली आहे.



आर्थिक गणित कोलमडणार...
कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी पावसाळी कांदा एकमेव नगदी पीक असते. समाधानकारक पावसाच्या भरवशावर मका, बाजरी आणि उर्वरित क्षेत्रात शेतकरी या कांद्याची लागवड करतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. उन्हाळ्यात या परिसरात जलस्रोत आटत असल्याने दुसरी पिके घेणे अशक्य ठरले. ही वस्तुस्थिती पाहता कांदा लागवडीअभावी बहुतांश शेतकरी कुटुबांचे आगामी वर्ष आर्थिक विवंचतेत जाण्याची भीती आहे.

मजुरही पावसाच्या प्रतीक्षेत....
अगदी कोरोनाच्या लाटेदरम्यानही शेतातील कामे सुरू होती. त्यामुळे शेतीतील रोजगार हा हुकमी असल्याची प्रचिती आली. सध्या स्थितीत मात्र पेरण्या आटोपल्यानंतर कांदा लागवडीसाठी मिळणारी रोजगाराची संधी हुकली आहे. या काळात मागणी वाढून शेतमजुरांना दोन पैसे गाठीशी बांधता येतात. यंदा कांदा लागवड खोळंबली आहे. साहजिकच यामुळे शेतमजुरांनाही हाताला काम नाही.

आमच्या संपूर्ण गावाची अर्थव्यवस्था पावसाळी कांद्यावर अवलंबून आहे. परिसरातील डोंगरावर चांगला पाऊस झाल्यास छोटी - मोठी धरणे व बंधारे भरतात आणि आठ - दहा दिवसांत विहिरींना पाणी उतरते. या पाण्यावरच पावसाळी कांद्याची लागवड होते. यंदा मात्र पावसाचा जोर नाही. बंधारे, नाले कोरडेठाक आहेत. विहिरींनाही पाणी उतरले नाही. हजारो रूपयांची रोपे डोळ्यादेखत खराब झाली. आगामी संपूर्ण वर्ष आर्थिक अडचणीचे ठरण्याची भीती आहे.
- संजय पवार, प्रगतिशील शेतकरी, पिंपळदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhar Card : 'यासाठी' आधार कार्ड बाद, लाखो प्रमाणपत्र होणार रद्द, पोलीस तक्रारीचाही इशारा! राज्य सरकारचा नवा GR काय?

सर्फराज खान, अभिमन्य ईश्वरन यांच्यासाठी कसोटी संघाचे दार कायमचे बंद? गौतम, गिलचा त्यांच्यावर विश्वास नाही?

Sangamner Politics: कोणताही माईचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; संगमनेरमधील सभेत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; प्रचाराची मुदत 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत वाढवली

भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT