Girish Mahajan 
नाशिक

Onion Issue: कांदाप्रश्नी मुख्यमंत्री, व्यापारी अन् शेतकऱ्यांची पुढच्या आठवड्यात बैठक; महाजनांची माहिती

कांदा प्रश्नावर गिरीश महाजन यांनी बैठक बोलावली होती, या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : कांदाप्रश्नी मुख्यमंत्री, व्यापारी अन् शेतकऱ्यांची पुढील आठवड्यात एकत्रित बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. कांदा प्रश्नावर महाजनांनी शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली होती, या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. (Onion Issue CM Traders and Farmers Meeting will be in Next Week Girish Mahajan info)

महाजन म्हणाले, १८ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातील ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. यावर्षी पाऊस कमी आहे, त्यामुळं पुढच्या वर्षी कांद्याचा तुटवडा पडू शकतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी सरासरी भाव २ हजार रुपये आहे. ग्राहक आणि शेतकरी यांचा समतोल साधावा लागतो. आता २,४१० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न

आत्तापर्यंत ४ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. या खरेदीसाठी नाफेडची केंद्र वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील काळात कांद्याचे भाव वाढतील, पण शेतकऱ्यांना कायमस्वरुपी मदत कशी करता येईल, साठवण क्षमता कशी वाढवता येईल, भाव स्थिर ठेवता यावा यासाठी प्रयत्न केले जातील, असंही यावेळी महाजन यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

मुख्यमंत्री, व्यापारी, शेतकऱ्यांसोबत बैठक

दरम्यान, अनुदान एकदाच देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही महाजन यावेळी म्हणाले. आत्तापर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ८६५ कोटी रुपये अनुदान देण्यात आलं आहे.

हेच अनुदान आपण साठवण क्षमता वाढवण्यासाठी दिलं तर फायदा होईल. यापार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत (मंगळवारी किंवा बुधवारी) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व्यापारी, सभापती आणि शेतकरी यांच्याशी एकत्रित बैठक होईल. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल.

नाफेडला थेट विक्री शक्य नाही

नाफेडंच काम कांदा साठवणं आणि भाव वाढल्यास त्या ठिकाणी पाठवणं असं आहे. नाफेडला थेट बाजारात जाण्यासाठी तांत्रिक अडचणी आहे. सगळा सरसकट कांदा घेणंही नाफेडला शक्य नाही. २,४१० रुपये कांद्याचा निकष अगोदरच ठरलेला आहे.

कांद्यानं मागच्या काळात किती रडवलं आहे हे माहीत आहे ना? यावेळी कांद्याचा भाव १०० रुपयांपेक्षा जास्त होता. ४ हजार पेक्षा जास्त भाव देणं प्रॅक्टिकल नाही. मोदी सरकारच्या काळात धान्यांच्या एमएसपी दुप्पटपेक्षा जास्त वाढला आहे. विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावरुन राजकारण करू नये, असं आवाहनही यावेळी गिरीश महाजन यांनी केलं.

शरद पवारांना सवाल

कांदा प्रश्नावर शरद पवारांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. यावरुन गिरीश महाजन यांनी पवारांना राजकारण न करण्याचा सल्ला देत काही सवालही केले आहेत. पवार साहेब कृषी मंत्री राहिले आहेत. तुम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना किती मदत केली, हे सांगा. आपण सत्तेत असताना काय केलं? असा सवाल करताना त्यांचं विधान हे राजकीय आहे, त्यांना ते करावं लागणार आहे, असंही महाजन यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : सर्व भाजपचे एजंट आहेत - आझमी

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT