esakal
नाशिक

Onion potato Producers Union Election: बिनविरोधाची परंपरा यंदाही कायम; धनवटे, घुगेंचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा

Onion potato Producers Union Election: जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सोमवारी (ता.१८) माघारीच्या अंतिम दिवशी ३३ उमेदवारांनी माघार घेतल्याने संघाच्या १५ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

त्यामुळे संघाची बिनविरोधची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. बिनविरोध निवडीमुळे संघावर राजाराम धनवटे, रमेशचंद्र घुगे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या १५ जागांसाठी एकूण १०५ अर्ज दाखल झाले होते. (Onion potato Producers Union Election unopposed nashik news)

प्राप्त झालेल्या अर्जाची निवडणूक अधिकारी मनिषा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली छाननी झाली. यात संस्था, सोसायटी गटातून सर्वाधिक २७ अर्ज बाद झाले आहेत. अवैध अर्ज ठरल्यानंतर रिंगणात ४८ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते.

यात, संस्था, सोसायटी गटात ७ जागांसाठी ९, वैयक्तीक सभासद गटात ३ जागांसाठी ६, महिला राखीव दोन जागांसाठी ७, अनु, जाती-जमाती गट १ जागेसाठी २, इतर मागासवर्गीय गट (ओबीसी) १ जागेसाठी १८ तर, विशेष मागासवर्गीय गट (एनटी) १ जागेसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. ७ डिसेंबरपासून माघारी तसेच हरकती घेण्यात आल्या.

यात सहा उमेदवारांनी हरकती नोंदविल्या होत्या. मात्र, सुनावणी होऊन या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या. सोमवारी माघारीचा अंतिम दिवस होता. त्यामुळे उमेदवारांची माघारीसाठी मनधरणी करण्याचे काम सुरू होते. संघाचे नेते राजाराम धनवटे, रमेशचंद्र घुगे यांच्या उपस्थितीत सकाळपासून बैठकांचे सत्र सुरू झाले. यात प्रमुखांच्या माघारी घेण्यासाठी कसरत करावी लागली. अखेर दुपारी तीनपर्यंत प्रमुख सर्व माघारी झाल्या.

नवीन चेह-यांचा समावेश

संघात सुरवातीपासून असलेले हिरे कुटुंबातील सदस्य संघावर राहिले. मात्र, यंदा अव्दय व अपूर्व हिरे यांनी दोघानांही माघार घेतली. चांदवडमधून डाॅ. आत्माराम कुंभार्डे यांचे अर्ज बाद झाल्याने त्यांच्याजागी विकास भुजाडे यांना संधी मिळाली. सिन्नरमधून बाळासाहेब वाघ व लक्ष्मीकांत कोकाटे या दोन जणांना संधी मिळाल्याने प्रथमतः संघावर आले आहेत. रत्नाकर चुंभळे व रामदास सानप यांना दुस-यांदा संधी देण्यात आली आहे.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार

सोसायटी गट (७ जागा) ः रमेशचंद्र घुगे, निवृत्ती महाले, विकास भुजाडे, बाळासाहेब वाघ, रमेश आबा पिंगळे, संजय पवार, लक्ष्मीकांत (मुन्नाशेठ) कोकाटे.

वैयक्तीक सभासद गट (३ जागा) ः राजाराम धनवटे, चंद्रकांत कोशिरे, बापूसाहेब कुंदे

ओबीसी गट (१ जागा) ः रत्नाकर चुंभळे

अनुसूचित जाती-जमाती (१ जागा) ः काशिनाथ हिरे

भटक्या जाती-विमुक्त जाती (१ जागा) ः रामदास सानप

महिला राखीव (२ जागा) ः रंजना घोरपडे, इंदूबाई गवळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election: बिहारमध्ये NDA सरकार की...? जनतेचा विश्वास कुणावर? निवडणुकीआधी धक्कादायक ओपिनियन पोल समोर

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

Samruddhi Expressway: समृद्धीवरून थेट मुंबईत पोहोचता येणार, वाहतूक कोंडीतून सुटका होणार; एमएमआरडीएचा नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT