marathi news nasik onion production
marathi news nasik onion production  esakal
नाशिक

Onion Production : कांदा आगारात उत्पादनात यंदा सव्वादोन लाख क्विंटलने घट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कांद्याच्या भावातील घसरणीमुळे सरकारच्या विरोधात आंदोलनाची ठिणगी पडली आहे. त्यातच, आज यंदाच्या कांद्याच्या अंतिम लागवडीची स्थिती स्पष्ट झाली. त्यावरून कांद्याच्या आगारात यंदा सव्वादोन लाख क्विंटलने उत्पादनात घट झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

त्याचवेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र आठ हजार ४९७ हेक्टरनी वाढले आहे. (Onion production has decreased by one half lakh quintal this year nashik news)

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये दोन कोटी नऊ लाख ९९ हजार ४१० क्विंटल कांद्याची निर्यात झाली. ही निर्यात २०२१ च्या तुलनेत ४८ टक्के अधिक आहे. आता मात्र कांद्याच्या भावातील घसरण शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे.

उत्पादनखर्च निघत नसल्याने आर्थिकदृष्ट्या शेतकरी हतबल झाले आहेत. ही सारी परिस्थिती पाहाता लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना अनुदान देण्यापासून खरेदी करणे आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या विविध मागण्या सरकारकडे करण्यास सुरवात केली आहे.

लासलगाव बाजार समितीत लेट खरीप कांद्याच्या भावात २५ ते २७ टक्क्यांनी घसरण होऊन क्विंटलचा सरासरी भाव साडेसहाशे रुपयांच्या खाली पोचला आहे. देशातील कांद्याच्या उत्पादनाची स्थिती पाहता, कमी झालेल्या किमती कशा सुधारणार? असा यक्ष प्रश्‍न तयार झाला आहे.

खरीप अन् लेट खरीपमध्ये मोठी घट

जिल्ह्यातील कांद्याच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप आणि लेट खरिपामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. खरिपात यंदा तीन हजार १७५ हेक्टरने कमी कांद्याची लागवड झाली. लेट खरिपात नऊ हजार ५२१ हेक्टरने क्षेत्र कमी राहिले आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

गेल्या वर्षी उन्हाळ हंगामात दोन लाख १६ हजार ६७४ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. यंदा हेच क्षेत्र दोन लाख २० हजार ८६४ हेक्टरपर्यंत पोचले आहे. आकडेवारीच्या आधारे उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात घट झाली नसल्याचे समाधान कृषी क्षेत्रात असले, तरीही एकूण वर्षभरातील उत्पादनातील घटीमुळे जिल्ह्यातील अर्थकारणाला चटके बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उन्हाळ कांद्याची अंतिम लागवड (यंदाचे आकडे हेक्टरमध्ये)

- बागलाण - ५१ हजार ७३३

- मालेगाव - ३४ हजार ६००

- कळवण -२६ हजार १०९

- येवला - २५ हजार २७८

- देवळा - २१ हजार ३६४

- निफाड - १४ हजार ७९१

- सिन्नर - ११ हजार ८५८

- नांदगाव - ११ हजार १२३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT