onion
onion  esakal
नाशिक

Onion Rates Fall : कांदा भाव घसरणीने 3 दिवसात 15 कोटींचा फटका! पाकिस्तानकडून आयात बंद

महेंद्र महाजन

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानने पोटाची खळगी भरण्याकडे लक्ष केंद्रित केलेले असताना दुबईमधून होणाऱ्या भारताच्या कांद्याची आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचवेळी पश्‍चिम बंगालमधील कांदा बांगलादेशची गरज भागवत असल्याने महाराष्ट्रातून कांद्याची निर्यात जवळपास थांबल्यात जमा आहे. शिवाय गुजरातमधील कांदा अजूनही बाजारात येत असून चाकण-पुणे भागातील नवीन कांद्याची आवक सुरु झाली.

या साऱ्याचा परिणाम म्हणजे, कांदा उत्पादक नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांमध्ये क्विंटलला सरासरी दोनशे रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांना १५ कोटींचा फटका बसला. (Onion Rates Fall 15 crore hit in 3 days due to fall in onion prices Import from Pakistan stopped nashik news)

जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये दिवसाला सव्वादोन लाख क्विंटलच्या आसपास कांद्याची आवक होत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गेल्या महिन्यात क्विंटलला दीड हजार ते सोळाशे रुपयांपर्यंत भाव मिळत होता.

या महिन्याची सुरवात बाराशे रुपये क्विंटल या भावाने झाली. पुढे भावात घसरण झाल्यावर ६ फेब्रुवारीला पुन्हा बाराशे रुपये भाव मिळाला. त्यानंतर मात्र कांद्याच्या भावातील दिवसागणिक घसरण सुरु राहिली.

आज क्विंटलला सरासरी लासलगावमध्ये ८५१, तर पिंपळगावमध्ये ८०१ रुपये असा भाव राहिला. इतर बाजारात हाच भाव ७०० ते ७५० रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

दरम्यान, चाकण-पुणे भागात नवीन कांद्याची आवक सुरु होताच, दुबई, सिंगापूर, लंडनमधील निर्यातीसाठी निर्यातदारांना ‘ऑफर' येऊ लागली आहे. प्रत्यक्षात मात्र भावातील पडझडीमुळे खरेदीदारांमध्ये फारसा उत्साह नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

निर्यात भावात किलोला ३ रुपयांची घसरण

गेल्या आठवड्याच्या तुलनेत निर्यातीच्या भावात किलोला सरासरी ३ रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याच्या एक टनाला श्रीलंकेसाठी २३० ते २४०, मलेशियासाठी २४०, दुबईसाठी २६०, सिंगापूरसाठी २७०, अरब राष्ट्रांमध्ये २८० ते २९० डॉलर असा भाव आता झाला असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली.

मुळातच, पाकिस्तानमध्ये नवीन कांद्याची आवक सुरु झाली आहे. मात्र पाकिस्तानमधील ग्राहकांसाठी कांद्याची अजून आवश्‍यकता आहे. पण ‘आटा घ्यायचा की कांदा’ अशा कात्रीत सापडलेल्या पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारीपासून कांद्याची आयात थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती निर्यातदारांपर्यंत धडकली आहे.

पाकिस्तानसाठी भारतातून थेट कांद्याची निर्यात होत नव्हती. दुबईमधील आयातदार पाकिस्तानसाठी कांदा मागवून पुढे पाठवत होते. मात्र पाकिस्तानने कांदा आयात बंदीचा निर्णय घेतल्याने दुबईमधील व्यापाऱ्यांनी खरेदीकडील हात आखडता घेतला आहे.

सध्यस्थितीत पाकिस्तानमधून कांद्याची निर्यात होईल, अशी स्थिती नाही. त्याचप्रमाणे चीनचा नवीन कांदा बाजारात आला असला, तरीही त्याचा टनाचा भाव ४५० डॉलरपर्यंत आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याचा अडसर जागतिक बाजारपेठेत येणार नाही, असा अंदाज निर्यातदारांनी बांधला आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

लासलगावमधील कांद्याचे भाव (क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये असून कंसात पिंपळगावमधील भाव)

० २ फेब्रुवारी-१ हजार २०१

० ३ फेब्रुवारी-१ हजार १८०

० ४ फेब्रुवारी-१ हजार १५१

० ६ फेब्रुवारी-१ हजार २३०

० ७ फेब्रुवारी-१ हजार १५१ (१ हजार १०१)

० ८ फेब्रुवारी-१ हजार १०० (१ हजार ५१)

० ९ फेब्रुवारी-१ हजार (१ हजार १००)

० १० फेब्रुवारी-९८० (९५०)

० ११ फेब्रुवारी-९६० (९५०)

० १३ फेब्रुवारी- ८५१ (८०१)

"दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, हरियाना या भागामध्ये होळीनिमित्त कांद्याची मागणी चांगली राहते. त्यासाठी या आठवड्याच्या अखेरपासून कांदा पाठवण्यास सुरवात होईल. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याच्या भावाला चांगला आधार मिळू शकेल. सध्यस्थितीत हवामान चांगले असल्याने कांद्याचे अधिक उत्पादन आणि गुणवत्ता चांगली मिळत असल्याने त्यास भाव मिळणे आवश्‍यक आहे. त्याकरिता कांद्याच्या निर्यातीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल."

- विकास सिंह, कांद्या निर्यातदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT